तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा

मुंबई
पूजा विचारे
Updated Sep 21, 2019 | 10:03 IST

संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. 

Election Commission
तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
  • आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रसह देशाला उत्सुकता लागली आहे. 

मुंबईः  महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र या दिवसाची वाट पाहत आहे आणि आज अखेर तो दिवस उजाडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रसह देशाला उत्सुकता लागली आहे. 

आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुकीची शक्यता आहे. 

 

 

2014 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा 20 सप्टेंबरला करण्यात आली होती. तर 15 ऑक्टोबरला मतदान झालं होतं आणि निवडणुकीचा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर झाला होता. 2014 मध्ये झारखंड राज्यात 25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबर यामध्ये 5 टप्प्यात मतदान झालं होतं. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक गेल्यावेळी 12 सप्टेंबरला जाहीर झाली होती आणि आचारसंहिता लागली होती. गेल्यावेळीच्या तुलनेत यंदा तारखांची घोषणा करण्यात उशीर झाला आहे. 

 

 

गुरूवारी निवडणूक आयोगाचे तीन आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. तसंच निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. 

महाराष्ट्र- हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 288 पैकी 122 जागांवर विजय मिळवला होता. अशाप्रकारे हरियाणामध्ये भाजपनं बहुमत मिळवलं होतं.  भाजपसमोर या राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आणण्याचं आव्हान आहे. महाराष्ट्रमध्ये काँग्रेस- एनसीपी, झारखंडमध्ये जेएमएम आणि हरियाणामध्ये काँग्रेस सत्तेत पुन्हा परतण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रमध्ये विधानसभेची जागा 288 जागा आहे. हरियाणामध्ये 90 जागा आहे. झारखंडमध्ये विधानसभेची 81 जागा आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि एनसीपीनं आघाडीची घोषणा केली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती संदर्भात बातचीत सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी