Election Ward Reservation Lottery: मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांमधील निवडणुका (Election) घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे प्रशासकाच्या माध्यमातून शहरांचा कारभार हाकला जात होता. मात्र, आता लवकरच सर्व शहरांना त्यांचे लोकप्रतिनिधी मिळणार आहे. कारण आता लवकरच महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठीच आज अनेक ठिकाणी आरक्षण सोडती (Ward Reservation) जाहीर करण्यात आल्या आहेत. (election ward reservation draw in important municipalities of maharashtra in just one click)
राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज (२९ जुलै) आरक्षण सोडती जाहीर झाल्या. पाहा महत्त्वाच्या शहरांमधील आरक्षण सोडती एकाच ठिकाणी.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2022) आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण (OBC reservation) सोडत काढण्याचे निर्देश दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडली.
याआधी एससी, एसटी प्रवर्गाचे आरक्षण घोषित झाले होते. त्यामुळे 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी आज काढण्यात आली. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत.
अधिक वाचा:
या आरक्षणाचा फटका शिवसेनेच्या काही दिग्गज नेत्यांना बसला आहे. यामध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि तृष्णा विश्वासराव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिल्याने सर्वच महापालिकांमधील निवडणुकीत ओबीसींसाठी राखीव जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ठाणे मनपा निवडणुकीसाठी आज डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ओबीसी समाजाच्या १५ जागांकरिता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढण्यात आली.
यापैकी आठ जागा ओबीसी महिलांसाठी आणि सात जागा ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी असणार आहेत. ओबीसींकरिता प्रभाग निश्चित करण्यात आलेले नसून केवळ चार सदस्यांचा एकमेव प्रभाग ओबीसीसाठी राखीव केला आहे. त्यामुळे उर्वरीत १४ ओबीसी जागांकरिता ३३ प्रभागांत कुठेही आरक्षण पडण्याची शक्यता असल्याने या प्रभागातील खुल्या गटातील उमेदवारांची चिंता वाढली आहे. ठाणे महानगर पालिकेची आरक्षण सोडत महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत काढण्यात आली.
अधिक वाचा:
अनुसूचित जातीसाठी आयोगाने थेट आरक्षित केलेल्या १० प्रभागांपैकी ३, १२, १५, २३, २९ मधील अ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर, १०, २४, २७, ३४ आणि ४४ मधील‘अ’अनुसूचित जातीच्या पुरुषांसाठी यापूर्वीच राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी आयोगाने थेट आरक्षित केलेल्या ३ प्रभागांपैकी ५ अ, २९ ब जागा महिलांसाठी तर, ६ अ जागा अनुसूचित जमातीच्या पुरुषांसाठी यापुर्वीच निश्चित करण्यात आल्या आहेत.
शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास वर्ग महिलांकरिता ४, ४३, ४६,२, ७,१९, १४, ४२ या प्रभागातील अ जागा तर, नागरिकांचा मागास वर्ग पुरुषांकरिता २६, २८, १७, २०, ३२, ४७, १६ या प्रभागातील अ जागा आरक्षित झाली आहे. सर्वसाधारण महिलांकरिता ३२ जागा राखीव करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वसाधारण महिलांकरिता ३, १८,१९, २३, ३०, ३३, ३६, ३७, ३९, ४३ या प्रभागातील ब जागा निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. तर, १, १४, ५, ३१, १३, ३८, ९, २२, ४१, ११, ४०, ७, १२, ४, ४६, २, १५, २५, ८, २१, ४५ या प्रभागातील ब जागा सोडतीद्वारे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा:
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी जाहीर करण्यात आलेले महिलांचे आरक्षण रद्द करून आज ते पुन्हा नव्याने जाहीर करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
अधिक वाचा:
कल्याण-डोंबिवली महापालिकेची यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होत आहे. यासाठी एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला ) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता आज नागपूर महापालिकेच्या टॉऊन हॉल येथे सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. यावेळी मनपा निवडणबक लढविण्यास इच्छुक उमेदवार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अधिक वाचा:
नागपूर महापालिकेत एकूण 52 प्रभाग असून यामध्ये 156 जागा आहेत. या 156 जागापैकी 35 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गकरिता राखीव ठेवण्यात आल्या असून आज महिलांचा राखीव जागांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. नागपूर महापालिकेत 156 जागांपैकी अनुसूचित जातीच्या 16, अनुसूचित जमातीच्या 6 , नागरिकांचा मागास प्रवर्ग च्या 18, सर्वसाधारण 38 अश्या एकूण 78 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहे.
30 जुलै रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाणार असून आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या शनिवार ३० जुलै ते मंगळवार २ ऑगस्ट या कालावधीत दुपारी ३ वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेची मागील आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा एकदा नव्याने आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 113 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 30 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यापैकी महिलांसाठी आरक्षित आहेत. तर अनुसूचित जातींसाठी 16 आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव असणार आहेत.
अधिक वाचा:
अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागांसाठी आधीच आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते वगळून ओबीसी प्रवर्ग आणि महिलांसाठींच्या जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले. सोलापुरातल्या नियोजन भवन या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खराटे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला.
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने अकोला महापालिका निवडणुकीत ओबीसींच्या जागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली. यापूर्वी महिलांसाठी (खुला प्रवर्ग) आरक्षित केलेल्या 37 जागा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. तर ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित केल्या गेल्या असून त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या असल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आता महापालिकांच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्याने लवकरच या महापालिकांसाठी निवडणुकी देखील जाहीर करण्यात येतील. त्यामुळे राज्यात एकीकडे सत्ताबदल झालेला असताना आता राज्यातील महापालिकांमध्ये सत्ता कोण मिळवतं याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.