महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका नाही होणार 

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 05, 2022 | 16:17 IST

Elections will not be held in Maharashtra till the end of September : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका होणार नाही.

Elections will not be held in Maharashtra till the end of September
महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका नाही होणार  
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका नाही होणार 
  • महाराष्ट्रात साधारण दीड महिन्यात पावसाळा सुरू होईल
  • पुढचे दोन महिने भरपूर पाऊस असेल

Elections will not be held in Maharashtra till the end of September : मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका होणार नाही.

निवडणुकीशी संबंधित अनेक कामं निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या कक्षात पूर्ण केली जातात. महाराष्ट्रात साधारण दीड महिन्यात पावसाळा सुरू होईल. नंतर पुढचे दोन महिने भरपूर पाऊस असेल. अशा परिस्थितीत राज्यात निवडणूक घेणे कठीण आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ पर्यंत घेणे शक्य होणार नाही, अशा स्वरुपाचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या हवाल्याने दिले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणार की अडचण सांगून निवडणूक आयोग वेळ मागणार हे न्यायालयात स्पष्ट होईल. पण ताज्या वृत्तामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निवडणुका होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

चौदा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका मार्च २०२०च्या जुन्या प्रभाग रचनेनुसार घ्याव्या आणि त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर निवडणूक आयोग अधिकृतरित्या काय भूमिका जाहीर करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी