मुंबई : कोळशाची टंचाई होत असल्यानं राज्यात भारनियमनचे संकट घोंघावत आहे. भारनियमन (loadshedding) होत असल्यानं राज्य सरकारवर (state government) टीका केली जात आहे. राज्यातील नागरिक अंधारात राहण्याची चिंता करत असतानाच ऊर्जामंत्र्यांनी नव्या दाव्या प्रकाश करत नागरिकांना दिलासादायक बातमी आज दिली आहे.
राज्यात कोळशाची (coal) टंचाई आहे पण कुठेही लोडशेडींग नाही, येत्या काळात कोळसा टंचाईमुळे वीजेची तूट झाली असून याला पर्याय म्हणून 'महाजनको' 8 हजार मेगावॅट वीज निर्माण करून राज्याला देईल अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना आज दिली. ते म्हणाले, देशात कोळसा टंचाईची अवस्था निर्माण झाली आहे. देशातील वीज टंचाईचे स्वरूप कसे राहील आणि या टंचाई काळात आपण काम कसे करू शकणार, हे महत्वाचे असून त्यावरून राज्याच्या भारनियमनाचे स्वरूप ठरेल. आता राज्यात विजेची तूट 15 टक्क्यांच्या आसपास आहे ही गंभीर बाब त्यांनी सांगितली.
राज्यातील वीज टंचाई, भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात महावितरण आणि महाजनकोतर्फे सादरीकरण करण्यात आले. आम्ही किती छोट्या-छोट्या पातळीवर काम करीत आहोत हे त्यांना दाखवले असेही ऊर्जामंत्री म्हणाले.''आम्ही साडेसात हजार मेगावॅट वीज निर्मितीची तयारी ठेवली होती. त्यात आता मुख्यमंत्र्यांनी 500 मॅगावॅट वीज निर्मिती जादा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता महाजनको 8 हजार मॅगावॅट वीज निर्मिती करून ती राज्याला देईल, त्यामुळे विजेची तुट कमी होईल असेही ते म्हणाले.
कोळशाची वाहतूक करण्यासाठी आम्हाला दरदिवशी रेल्वेचे 37 रॅक लागतात पण प्रत्यक्षात 26 रॅक मिळतात त्यामुळे आम्हाला कोळसा वेळेवर मिळत नाही. रोज 1 हजार मेट्रिक टन कोळशाचा शॉर्टफॉल होतो. ही तुट भरण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असतो, असेही ते म्हणाले.
कोळसा आणि रॅकची टंचाई असताना मागील पाच ते सहा दिवसांत लोडशेडिंग आम्ही होऊ दिली नाही. आंध्र, हरियाना, पंजाबसह 12 राज्यात विजेची टंचाई निर्माण झाली पण आपण टंचाई निर्माण झाली तरी ती तुट भरून काढत आहोत असेही नितीन राऊत म्हणाले.
केंद्र सरकार जे आरोप आमच्यावर लावत आहे ते आता त्यांच्यावरच उलटले आहेत. कारण थर्मल प्लॅंट देशी कोळशावर चालत आहेत. त्यांनाही कोळसा द्यावा लागतो. कोळसा उत्पादन आणि मिळणारे रेल्वेचे रॅक यात तफावत आहे आणि हे रेल्वेच्या एका अर्थाने केंद्राच्या हाती आहे असेही ते म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.