Aaditya Thackeray on EV : पर्यावरण मंत्री म्हणतात, राज्यातील सर्व सरकारी वाहने असतील इलेक्ट्रिक, एप्रिलऐवजी जानेवारीपासूनच अमंलबजावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 02, 2022 | 17:22 IST

Environment Minister Talk About Electric Vehicles :  नववर्षाच्या (New Year) सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री  (Maharashtra Environment Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Vehicles) गाड्यांमुळे होणारे प्रदुषण (Pollution) रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government)  मोठं पाऊल उचलले आहे.

Environment Minister says all government vehicles in the state will have electric
सरकारी वाहनांविषयी आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासूनच झाली.
  • पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक वाहने हे चांगले पर्याय आहेत, असे आदित्य ठाकरेंचं मत आहे.

Aaditya Thackeray on Electric vehicles :  मुंबई : नववर्षाच्या (New Year) सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री  (Maharashtra Environment Minister) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Vehicles) गाड्यांमुळे होणारे प्रदुषण (Pollution) रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government)  मोठं पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिकच (Electric Vehicles) असतील, असं आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे. खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासूनच झाली  असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबतची माहिती, आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या या निर्णयाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठिंबा दिला आहे. या तिनही मंत्र्यांनी आपल्या निर्णयाला पाठिंबा दिल्याने आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर त्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इलेक्ट्रिक वाहने हे चांगले पर्याय आहेत, असे आदित्य ठाकरेंचं मत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे याआधी अनेक इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये हजर राहिले आहेत. तसेच सरकार राज्यातील परिवहन विभागातही इलेक्ट्रिक वाहन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबई महापालिकेच्या 'बेस्ट'मध्ये याबाबतची सुरुवातदेखील झाली आहे. बेस्टमध्ये काही इलेक्ट्रिक बसेसची टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती होईल- गडकरी 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मोठी घोषणा केली होती. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात लवकरच क्रांती होईल, असा सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. इलेक्ट्रिक वाहनं कमी खर्चात जास्त अंतर कापू शकतात. त्यामुळेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री भरपूर होईल, अशी अपेक्षा नितीन गडकरींनी व्यक्त केली होती. 'पेट्रोलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान 10 रुपये, डिझेलवर चालणाऱ्या कारला प्रति किलोमीटर किमान सात रुपये, तर विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रति किलोमीटर एक रुपया एवढाच खर्च येतो,' असं ते म्हणाले.

दरम्यान  पेट्रोल आणि डिझेलचे भाव सध्या रोज वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांना अनेकजण पर्याय शोधत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सध्या देशभरात चांगलाच लोकप्रिय होत आहे. परंतु या इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचे पर्याय चांगला असला, तरी त्या घेण्याचं सर्वसामान्यांची हिंमत होत नाही. आता मात्र हे चित्र बदलेल अशी शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी