Mumbai Epidemic Diseases : मुंबईत पावसाचे आगमन यंदा जुलै महिन्यात झाले. पावसासोबतच मुंबईत साथीच्या आजारांचेही आगमन झाल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी हा मुद्दा आकडेवारीसह मुंबई महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. साटम यांनी मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू नये यासाठी आवश्यक ते उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाने केलेल्या कारवाईची माहिती सविस्तर कळवा असेही अमित साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.
बैलांच शिंग लागलं विजेच्या ताराला, दोन सख्ख्या भावांसह बैलांचा मृत्यू
मुंबईत जुलै २०२२ पासून पावसाला सुरुवात झाली आणि साथीच्या आजारांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच मुंबईत लेप्टोचे ११, स्वाईन फ्लूचे ११, डेंग्यूचे ३३, हिवतापाचे २४३ रुग्ण आढळले आहेत. जुलै २०२२ या एकाच महिन्यात वेगवेगळ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. यामुळे मनपाने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू नये यासाठी ठोस उपाय करावे अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.
तरुणाची तिघांनी घरात घुसून केली हत्या, पोलीस आले तेव्हा......
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणे, रस्स्त्यांवर ओला कचरा साठणे यामुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागतो. यंदाच्या वर्षीही हीच परिस्थिती दिसून येत आहे. आधीच कोरोना संकट सुरू असताना आता साथीच्या आजारांचे रुग्णही वाढत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येण्याची चिन्हं आहेत. याच कारणामुळे मनपाने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढू नये यासाठी ठोस उपाय करावे अशी मागणी भाजप आमदार अमित साटम यांनी केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.