Buldhana Pensioners : Eps-95 पेन्शन धारकांनी पंतप्रधान मोदींना रक्ताच्या ठशांचे पाठवणार निवेदन

मुंबई
विजय तावडे
Updated Jun 14, 2022 | 13:46 IST

Old Pensioners : जुने पेन्शनधारक वेळोवेळी आपल्या परिस्थितीबद्दल आणि पेन्शनच्या स्थितीबद्दल लढा देत असतात. मात्र आता पेन्शनधारकांनी आपल्या रक्ताच्या ठशांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील EPS-95 जुन्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत जाऊन आपल्या रक्ताचे अंगठ्याचे ठसे देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी भावनिक साद घातली आहे.

EPS-95 Pensioners fight for pension
EPS-95 पेन्शनधारकांचा लढा 
थोडं पण कामाचं
  • चक्क रक्ताने माखलेले अंगठ्याचे ठसे देऊन नरेंद्र मोदींना पाठवले निवेदन
  • निवृत्त कर्मचाऱ्यांची नरेंद्र मोदींना पेन्शन वाढीसाठी आर्त हाक
  • पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या रकमेचा प्रश्न बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित

EPS-95 Pensioners : बुलढाणा : जुने पेन्शनधारक वेळोवेळी आपल्या परिस्थितीबद्दल आणि पेन्शनच्या स्थितीबद्दल लढा देत असतात. मात्र आता
पेन्शनधारकांनी आपल्या रक्ताच्या ठशांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील EPS-95 जुन्या पेन्शन धारक कर्मचाऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत जाऊन आपल्या रक्ताचे अंगठ्याचे ठसे देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी भावनिक साद घातली आहे. खामगाव शहरातील जुन्या पेन्शनधारकांनी हे पंतप्रधानांना पाठवलेल्या निवेदनासाठी आपल्या रक्ताचे ठसे दिले आहेत. जुन्या पेन्शनधारकांचा प्रश्न सर्व देशभरातून चर्चेला आहे. (EPS-95 Pensioners to send application with blood to PM Narendra Modi)

अधिक वाचा : राज्यसभा निवडणुकीचा राष्ट्रवादीनं घेतला धसका; विधान परिषदेसाठी शरद पवारांनी नेत्यांना दिल्या 'या' सूचना

तुटपुंजे पेन्शन मिळत असल्याने आंदोलन

जुन्या पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनपोटी फक्त 2,500 ते 3,000 रुपये मिळत आहेत. देशभरातून अशा पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. आधीच ही रक्कम तुटपुंजी असताना महागाईचा आगडोंब उसळला आहे. अशा परिस्थितीत या जुन्या पेन्शनधारकांना त्यांचा उदरनिर्वाह करणे निव्वळ अशक्य होऊन बसले आहे. सध्याच्या या महागाईच्या काळात इतक्या पेन्शनमधून किराणा किंवा औषधे यातील एकही बाब पेन्शनधारकांच्या आवाक्यात राहिलेली नाही.

अधिक वाचा : अनिल देशमुखांची Default Bail साठी न्यायालयात धाव; CBI चा जोरदार विरोध, आज पुन्हा सुनावणी

स्मशानभूमीत जाऊन रक्ताच्या ठशांचे निवेदन

गेल्या अनेक वर्षापासून हे eps-95 पेन्शन धारक निवृत्त कर्मचारी आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर त्यांनी आंदोलनास सुरूवात केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्मशानभूमीत जाऊन आपल्या निवेदनावर हे निवृत्त कर्मचारी स्वतःच्या रक्ताचे ठसे उमटवून संबंधित निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांची ही साद ऐकून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी हे कर्मचारी करताना दिसत आहेत.

अधिक वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असेल पुणे- मुंबईतल्या कार्यक्रमांचं वेळापत्रक

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर ते मुंबईला रवाना होतील. या कार्यक्रमात मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गैरहजर राहणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील.

प्रथम पुण्यातल्या देहू येथील कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित असतील. त्यानंतर मुंबईतल्या तीन कार्यक्रमांना त्यांची हजेरी असेल. देहूमधील कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारकऱ्यांसमोर भाषण करणार आहेत. साधारण दीड ते दोन तास हा कार्यक्रम सुरू राहणार आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी