Uddhav Thackeray : कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार? उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. आता शिवसेनेतून फुटलेले नेते कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता सामान्यांमधूनच असामान्य असे काही तरी घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

uddhav thackeray interview
उद्धव ठाकरे मुलाखत  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
  • आता शिवसेनेतून फुटलेले नेते कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
  • तसेच आता सामान्यांमधूनच असामान्य असे काही तरी घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती (BJP Alliance) करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) स्थापन केले. आता शिवसेनेतून फुटलेले नेते कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आता सामान्यांमधूनच असामान्य असे काही तरी घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (ex cm and shivsena chief Uddhav Thackeray crititicized cm eknath shinde in latest interview by sanjay raut saamana teaser)

अधिक वाचा : MNS: उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...


सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी दोन भागांत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखातीचा एक टीझर नुकताच सामनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रसारित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सरकार आणि शिवसेनेत झालेली बंडखोरीवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. 

अधिक वाचा : CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपवर टीका केल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत सत्तास्थापन करतात. नितीश कुमार हे कुठले हिंदुत्ववादी नेते आहेत असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच नारायण राणेंपासून शिवसेनेत अनेक बंड झाले यावर उद्धव ठाकरे यांनी हे बंडखोर नेते आपल्या कपाळावरील विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार असा सवाल या शिंदे गटाला केला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि शिवसेनेला खरा पक्षा कुणाचा याबद्दल पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावर हे लोक आता स्वतःला शिवसेना पक्षप्रमुख समजत आहे का? हे लोक स्वतःची तुलना शिवसेना पक्षप्रमुखांशी करतात का असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राऊत यांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का असा प्रश्न विचारला आहे, याचे उत्तर उद्या प्रसारित झालेल्या मुलाखातीतच मिळेल. परंतु आता सामान्यातूनच असामान्य घडेल असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा : CM Eknath Shinde: शिंदेचा दानवेंवर पलटवार, 'तो काय त्यांचा बॉस आहे...'

फडणवीस आणि राज ठाकरे यांना उत्तर देणार का ?

पनवेलमध्ये फडणवीस म्हणाले होते की, निकालापूर्वीच शिवसेनेचे राष्ट्रवादीसोबत ठरले होते, त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपला फोन घेणे बंद केले होते. निकालापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सर्व मार्ग खुले आहेत असे म्हणाले होते याची आठवणही करून दिली. आता यावर उद्धव ठाकरे काय म्हणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेची अशी अवस्था झाली अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखातीत केली होती. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असेही राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरे यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी