Uddhav Thackeray Interview : माझ्या शरीराच्या हालचाली थांबल्या तेव्हा बंडखोरांच्या हालचाली सुरू झाल्या, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली, शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझे शरीर निश्चल पडले, माझ्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर बंडखोरांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच माझी ही अशीच अवस्था रहावी म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते असेही ठाकरे म्हणाले. 

uddhav thackeray interview
उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माझ्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर बंडखोरांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली
  • माझी ही अशीच अवस्था रहावी म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते
  • माझी तब्येत ठीक नसताना एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पक्षाची जबाबदारी सोपवली होती.

Uddhav Thackeray Interview : मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी पक्षातून बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली, शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझे शरीर निश्चल पडले, माझ्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर बंडखोरांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच माझी ही अशीच अवस्था रहावी म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते असेही ठाकरे म्हणाले. (ex cm Uddhav Thackeray criticized eknath shinde and bjp over toppling government in maharashtra)

अधिक वाचा : CM Eknath Shinde : भाजपसोबत युती झालेली पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली, तेव्हा ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी तब्येत ठीक नसताना एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पक्षाची जबाबदारी सोपवली होती. पक्षाती दुसर्‍या क्रमांकाचे पद मी त्यांच्याकडे दिले होते परंतु त्यांनी विश्वासघात केला असे ठाकरे म्हणाले. 

अधिक वाचा : MNS: उद्धव ठाकरेंना मोठा शह देण्यासाठी राज ठाकरेंची प्रचंड मोठी खेळी, म्हणाले...

उद्धव ठाकरे म्हणाले की, मानेवरची शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर डॉक्टरांनी मला विचारले की कुठे जायचे वर्षा की मातोश्री. मी नुकतंच गुंगीतून बाहेर पडलो होतो आणि मातोश्री असे उत्तर दिले. डॉक्टरांनी मला गुंगीत असतानाही विचारले असते तरी मी मातोश्रीच उत्तर दिले असते. मानेवरील शस्त्रक्रिया झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर माझ्या मानेत रक्ताची गाठ झाली होती. त्यामुळे मानेखालील माझे संपूर्ण शरीर निश्चल पडले होते. डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया केली म्हणून मी आज जिवंत आहे. मी लवकर बर होवो म्हणून काही लोक अभिषेक करत होते, तर मी कायम असाच राहो म्हणून काही लोक देव बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसणारे आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती, तेव्हा या लोकांच्या हालचाली सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आहे आणि हे मी संपूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

अधिक वाचा : "विधानपरिषदेत एका पक्षाचे तीन आमदार फुटले, तीन मतांसाठी २१ कोटी" अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी