Maharashtra Floor Test अजित पवार बहुमत चाचणीला उपस्थित राहणार की नाही? स्वतः दिली माहिती

Will Pawar attend the majority test or not? Information provided by yourself : अजित पवार बहुमत चाचणीला ते हजर राहणार की नाही यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी अजित पवार हे बहुमत चाचणीला उपस्थित राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे.

ajit pawar
अजित पवार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजित पवार हे बहुमत चाचणीला उपस्थित राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले
  • कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार – अजित पवार
  • रविवारी आणि सोमवारी बोलावण्यात आले आहे विशेष अधिवेशन

Ajit Pawar : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे कोरोना पॉजिटीव्ह आल्याने क्वारंटाईन होते. त्यामुळे बहुमत चाचणीला ते हजर राहणार की नाही यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठी अजित पवार हे बहुमत चाचणीला उपस्थित राहणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे. कोरोना नियमांचे पालन करीत आपण बहुमत चाचणीला हजर राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकानाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत आमदारांना घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले होते. त्यामुळे, राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे अल्पमतात आल्याने उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे मोठे नेते, वेळ आल्यावर गैरसमज दूर करू : केसरकर

कोरोनाला हरवून लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार – अजित पवार

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते कोरोन पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली होती. माझी प्रकृती चांगली असून, डॉक्टरानाचा सल्ला घेत आहे. आपल्या सरांच्या आशीर्वादाने आपण कोरोनाला हरवून आपल्या सेवेत रुजू होईन, असं अजित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली होती.

अधिक वाचा ; स्कूल बस चालकाने नववीत शिकणाऱ्या मुलीवर केला बलात्कार

रविवारी आणि सोमवारी बोलावण्यात आले आहे विशेष अधिवेशन

महाविकासआघाडी सरकार कोसळल्यावर एकनाथ शिंदे यांना आता बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी रविवारी आणि सोमवारी एक विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहेत. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. या चाचणीसाठी आता महाविकासआघाडी सरकार आणि शिंदे सामोरे जाणार आहे. 

अधिक वाचा : केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेल होणार महाग? 

एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठींबा घेत बनवली सरकार

शिवसेनेचे नेते एकानाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत शिवसेनेचे काही आमदार फोडले आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन ठेवले होते. एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडल्याने राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे अल्पमतात आले होते. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकासआघाडी सरकार कोसळले. महाविकासआघाडी सरकार कोसळ्यानंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने पाठींबा दर्शवला आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी