Anil Deshmukh arrested by ED अनिल देशमुखांना अटक, ईडीची कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 02, 2021 | 02:01 IST

Ex-Maharashtra home minister Anil Deshmukh arrested by ED in money laundering case खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली.

Ex-Maharashtra home minister Anil Deshmukh arrested by ED in money laundering case
अनिल देशमुखांना अटक, ईडीची कारवाई 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना अटक, ईडीची कारवाई
  • रात्री उशिरा अटकेची कारवाई
  • मंगळवार २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी कोर्टात हजर केले जाईल

Ex-Maharashtra home minister Anil Deshmukh arrested by ED in money laundering case । मुंबईः खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई कार्यालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना मंगळवार २ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी कोर्टात हजर केले जाईल. चौकशीसाठी ईडी अनिल देशमुख यांचा रिमांड मागण्याची शक्यता आहे. 

याआधी सोमवारी सकाळी ईडीच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी अनिल देशमुख हजर झाले. सतत मीडियासमोर राहणारे देशमुख वारंवार समन्स बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणे टाळत होते. ईडीने शोधून अटक करण्याची तयारी सुरू केली आणि अनिल देशमुख हजर झाले. तब्बल १२ तास त्यांची चौकशी झाली. चौकशीत देशमुख यांच्याकडून अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. अखेर ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी