Sudhir Mungantiwar । मुनगंटीवारांची सभागृहात गुगली, सेनेच्या या नेत्याला म्हटले तुम्ही सीएम मटेरियल 

महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभा सभागृहात शिवसेनेला टोला लगावून राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणली आहे.  

Ex minister and  BJP leader Sudhir Mungantiwar says Eknath Shinde is CM Materaial
मुनगंटीवारांची सेना नेत्याला गुगली, म्हटले सीएम मटेरियल 

थोडं पण कामाचं

  • तुम्ही सीएमपदाचे मटेरियल, राज्यमंत्र्यासारखी कृती नको!
  • भर सभागृहात मुनगंटीवार शिवसेना नेत्याला म्हणाले, 
  • सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात शिवसेनेच्या दिशेने गुगली बॉल टाकला

मुंबई:  महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभा सभागृहात शिवसेनेला टोला लगावून राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणली आहे.   एकनाथ शिंदे यांना भर सभागृहात तुम्ही मुख्यमंत्री मटेरियल असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कालदेखील सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भ विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर आज सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात शिवसेनेच्या दिशेने गुगली टाकला.

यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहारप्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून वाचवण्यात येत असल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. जवळपास १५ महिने उलटून या अधिकाऱ्याची चौकशी झालेली नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाईही झालेली नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले की, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची (सीएम मटेरियल) क्षमता आहे. त्यामुळे एखाद्या राज्यमंत्र्याप्रमाणे वागू नका, असे मुनगंटीवार यांनी म्हटले.

सभागृहात भाजपचा आक्रमक पवित्रा

राज्याच्या बजेट अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही गदारोळाने झाली. वीजबील वाढ आणि वीज कनेक्शन तोडण्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाचं कामकाज गदारोळात सुरु झाले. त्यादरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा वार्षिक 2017-18 अहवाल सभागृहासमोर मांडला. याशिवाय त्यांनी त्यांच्या विभागाचे विविध अहवालही पटलावर ठेवले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी