दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 04, 2022 | 16:52 IST

Extension till June 30 for Marathi nameplates on shops : मुंबई महानगरपालिकेने दुकानांवर मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील मोठ्या अक्षरातील सहज वाचता येतील असे नामफलक लावण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली

Extension till June 30 for Marathi nameplates on shops
दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ
  • याआधी ही मुदत ३१ मे २०२२ रोजी संपणार होती
  • व्यापाऱ्यांच्या विनंतीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले

Extension till June 30 for Marathi nameplates on shops : मुंबई : मुंबई महानगरपालिकेने दुकानांवर मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील मोठ्या अक्षरातील सहज वाचता येतील असे नामफलक लावण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी ही मुदत ३१ मे २०२२ रोजी संपणार होती. पण व्यापाऱ्यांच्या विनंतीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. 

दुकानावर अथवा आस्थापनावर वेगवेगळ्या भाषेत नामफलक असल्यास त्या सर्वांतील अक्षराचा आकार समान असावा किंवा या सर्व नामफलकांमधील मराठी नामफलकातील अक्षरांचा आकार हा इतर नामफलकांपेक्षा मोठा असावा असे बंधन घालण्यात आले आहे. यामुळे मराठी नामफलक तयार करून घेण्यास वेळ लागत आहे. प्रक्रिया सुरू आहे. पण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ आणि व्यापाऱ्यांची विनंती याचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. 

मोठ्या अक्षरातील मराठी नामफलक तयार करणारे आणि रंगविणारे कलाकार मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे मराठी नामफलक लावण्यास वेळ लागत आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. काही व्यापाऱ्यांनी वेळ वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झटपट मराठी नामफलक तयार करून घेतला आहे. मात्र हे तंत्र आर्थिकदृष्ट्या महाग असल्यामुळे अनेक व्यापारी आजही परंपरागत पद्धतीने दुकानावर मराठी नामफलक लावून घेत आहेत. यामुळेच प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

मुंबई महानगरपालिकेने २०१७च्या महाराष्ट्र दुकान आणि आस्थापने अधिनियमात बदल केला आहे. नव्या कायद्यानुसार दुकान आणि आस्थापनांवर मराठीत मोठ्या अक्षरातला आणि सहज वाचता येईल असा नामफलक लावणे बंधनकारक आहे. नव्या कायद्याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. पण मुंबई महानगरपालिकेने मुदतवाढ दिल्यामुळे ज्यांनी अद्याप मराठीतला मोठ्या अक्षरातला सहज वाचता येईल असा नामफलक लावलेला नाही त्यांना ३० जून २०२२ पर्यंत मुदत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी