आमदार नितीन देशमुखांचा दावा खोटा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 23, 2022 | 18:15 IST

False Claim From MLA Nitin Deshmukh says Eknath Shinde Supporters : शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा गुवाहाटी येथून स्वतःची सुटका करून पळून आल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. यात काहीही तथ्य नाही; असे एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाटी येथून जाहीर केले.

False Claim From MLA Nitin Deshmukh says Eknath Shinde Supporters
आमदार नितीन देशमुखांचा दावा खोटा 
थोडं पण कामाचं
  • आमदार नितीन देशमुखांचा दावा खोटा
  • नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला
  • एकनाथ शिंदे यांनी नितिन देशमुख यांची घरी परतण्याची व्यवस्था करण्याची सूचना दिली

False Claim From MLA Nitin Deshmukh says Eknath Shinde Supporters : शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचा गुवाहाटी येथून स्वतःची सुटका करून पळून आल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. यात काहीही तथ्य नाही; असे एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाटी येथून जाहीर केले. 

नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी त्यांना अकोल्याला पोहोचवले. या घटनाक्रमाचे निवडक फोटो एकनाथ शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहेत. 

पत्नी आजारी असल्याचे कारण दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नितिन देशमुख यांची घरी परतण्याची व्यवस्था करण्याची सूचना दिली. यानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी एका विशेष खासगी विमानातून नितीन देशमुख यांची नागपूरला जाण्याची व्यवस्था केली. या घटनेचे एकनाथ शिंदे गटाने फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले.

जाताना आम्ही नाष्टा, जेवण एकत्र केले. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही नागपुर विमानतळापर्यंत गेलो. तिथे गेल्यावर देशपांडे यांचे नातेवाईक होते, मित्र भेटले आणि त्यांचे कार्यकर्ते होते. देशपांडे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करुन आम्ही दोघे परत आलो; अशी माहिती एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवकांनी दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी