Kashiram Chinchay : कोळीगीते सातासमुद्रापार नेणाऱ्या काशीराम चिंचय यांचे निधन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 14, 2022 | 15:00 IST

Famous Koli Geet Paru Go Paru Vesavchi Paru maker Shahir Kashiram Chinchay passed Away : 'पारू गो पारू वेसावचे पारू' यासह अनेक कोळीगीते सातासमुद्रापार नेऊन लोकप्रिय करणाऱ्या काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे आज मकरसंक्रांतीच्या दिवशी (शुक्रवार १४ जानेवारी २०२२) पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.

Famous Koli Geet Paru Go Paru Vesavchi Paru maker Shahir Kashiram Chinchay passed Away
कोळीगीते सातासमुद्रापार नेणाऱ्या काशीराम चिंचय यांचे निधन 
थोडं पण कामाचं
  • कोळीगीते सातासमुद्रापार नेणाऱ्या काशीराम चिंचय यांचे निधन
  • ७१ वर्षांचे होते
  • मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना झाले निधन

Famous Koli Geet Paru Go Paru Vesavchi Paru maker Shahir Kashiram Chinchay passed Away : मुंबई : 'पारू गो पारू वेसावचे पारू' यासह अनेक कोळीगीते सातासमुद्रापार नेऊन लोकप्रिय करणाऱ्या काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे आज मकरसंक्रांतीच्या दिवशी (शुक्रवार १४ जानेवारी २०२२) पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा, मुलगा सचिन आणि तीन लग्न झालेल्या मुली असा परिवार आहे. दुपारी वेसावे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 

काशीराम चिंचय काही दिवसांपासून आजारी होते. उपचारासाठी त्यांना अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी त्यांना परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 

त्यांनी जवळपास पाच दशके कोळीगीतांवर भारतात तसेच परदेशात अनेकांना ठेका धरायला लावला. काशीराम चिंचय यांनी वेसावकर आणि मंडळी या कलापथकाच्या माध्यमातून निर्मिती केलेल्या वेसावकरांची कमाल, हिरोंची धमाल या अमिताभ बच्चन आणि काशीराम यांच्यातील संवादांनी आजही कोळीसंस्कृती चटकन डोळ्यांसमोर उभी राहते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी