मुंबईतील धक्कादायक घटना, कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार 

Female dog sexually assaulted: एका कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील पवई परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dog
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पवईत कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
  • अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल 
  • आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात

मुंबई : मुंबईतील पवई (Powai) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पवई परिसरात असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Complex) एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार (Female dog sexual assault) झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राणीप्रेमींनी या कुत्रीचे नाव नूरी असल्याची माहिती दिली आहे. या जखमी नूरीला उपचारासाठी प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. नूरी या कुत्रीच्या खागसी भागातून डॉक्टरांनी लाकडाचा एक तुकडा बाहेर काढला आहे. नूरीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राण्यांना अन्न आणि औषधे पूरवणाऱ्या एका महिलेची नजर नूरी या कुत्रीवर पडली. नूरी रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्या खासगी भागातून ११ इंचाचा लाकडी तुकडा बाहेर काढला. नूरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणाऱ्या देवी सेठ यांनी मुंबई मिररला सांगितले की, "नूरी रक्तबंबाळ अवस्थेत मला दिसली, ती बेशुद्ध पडली होती. तिच्या शेजारुन अनेक नागरिक ये-जा करत होते मात्र, कुणीही मदत केली नाही. मी नूरीला पाहिले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले."

नूरीच्या शरीरातून जरी लाकडाचा तुकडा डॉक्टरांनी काढला असला तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यासोबत जे काही कृत्य झाले आहे त्यामुळे तिच्या शरीरातील अनेक भागांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. सध्या नूरीवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्युशी झुंज देत आहे.

नूरीवर उपचार करण्यासाठी एक एनजीओ पुढे आली आहे आणि तिच्या उपचारासाठी निधी गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. तसेच नूरीला न्याय मिळावा अशी मागणीही या एनजीओने केली आहे. या संपूर्ण घटनेप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात ३७७ (अनैसर्गिक लैंगिक अत्याचार) आणि ९२ (प्राण्याला ठार मारण्याचा किंवा अत्याचार करण्याचा) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी