Fight between 2 armed groups in Malvani area of Malad in Mumbai : मुंबईत मालाडच्या मालवणी परिसरात 2 सशस्त्र गटांमध्ये राडा झाला. मालवणी परिसरातील बुद्ध नगर कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली. रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास 2 सशस्त्र गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांवर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला. हाणामारीचे स्वरुप असे होते की परिसरात दहशत पसरली. या घटनेमुळे मालवणीतील कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिकांमध्ये असुरक्षिततेची भावना नव्याने जोर धरू लागल्याचे चित्र आहे.
मालवणी परिसरातील बुद्ध नगर कच्च्या रस्त्यावर राहणाऱ्या एका टोळक्यातील काही सदस्यांचा कांदिवलीच्या चारकोप परिसरातील टोळीच्या सदस्यांसोबत वाद झाला होता. या वादातून आलेल्या रागापोटी बदला घेण्याच्या उद्देशाने चारकोप परिसरातील टोळीने मालवणी परिसरातील टोळीच्या सदस्यांवर हल्ला केला. ही घटना मालवणी परिसरातील बुद्ध नगर कच्च्या रस्त्यावर घडली.
हाणामारी करणाऱ्यांच्या हाती तलवार होती. दोन गटांच्या तुफान हाणामारीत तलवारीने हल्ला झाला. हाणामारीत 2 जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन चारकोप परिसरातून आलेल्या काही जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
मालवणीत झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओत भररस्त्यावर तरुणांच्या हातात तलवारी दिसत आहे. दोन गटाचे सदस्य रस्त्यावर आल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. काही महिला हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. पण हाती तलवार घेऊन आलेले त्यांना दाद देत नसल्याचे व्हिडीओत दिसते.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पण मुंबईतच भर दिवसा रस्त्यावर तलवारीचा वापर करून हाणामारी होत आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Raj Thackeray : कोकणात प्रकल्प आले तर स्थानिकांना कळत नाही ? राज ठाकरे यांचा सवाल
मालाड पश्चिमेला मालवणी हा मोठा परिसर आहे. मालाड विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे यापैकी किमान 1 लाख नागरिक मालवणी परिसरात वास्तव्य करतात. मालाडची किमान 10 टक्के लोकसंख्या ज्या मालवणीत वास्तव्य करते तिथेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. मालवणीत मागील काही वर्षांपासून मराठी लोकांच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत अल्पसंख्यांकांची मोठी लोकवस्ती मालवणी परिसरात आहे.
मालवणीत हाणामारी, शस्त्रांचा वापर, कायदा हाती घेणे असे प्रकार अनेकदा घडतात. यातील काही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होते. तर काही घटनांमध्ये स्थानिक पातळीवर परस्पर मिटवामिटवी होते. पण यावेळी भर रस्त्यात शस्त्रांच्या मदतीने हाणामारी झाली. या हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे ही घटना चर्चेचा विषय झाली. पोलीस हाणामारी प्रकरणी तपास करत आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. याआधी मालवणी भागातून विशिष्ट समाजाच्या नागरिकांनी घर सोडून कायमचे स्थलांतर करावे यासाठी दहशत पसरविणे, दबावतंत्राचा वापर करणे अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.