Aditya Thackaray यांच्याविरुद्ध FIR दाखल करा, राष्ट्रीय बालअधिकार आयोगाची मुंबई पोलिसांना निर्देश

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 12, 2022 | 08:26 IST

शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Udhav thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. आता युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Possibility of action against Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रीय बालअधिकार आयोगाकडून मुंबई पोलिसांना नोटीस
  • आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा ठपका
  • आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णयाविरोधात आदित्य ठाकरेंचं आंदोलन

Aditya Thackeray FIR: शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Udhav thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. आता युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध FIR दाखल करा, असे निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने (National Child Rights Commission) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. 

शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रीय बालअधिकार आयोगाकडून मुंबई पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आरे बचाव आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याचा ठपका राष्ट्रीय बाल अधिकार आयोग्याने ठेवला आहे. नोटीस मिळाल्यापासून पुढील तीन दिवसांत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्या संबंधित अहवाल देण्याची निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार आरोगाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Read Also : NASA नं प्रसिद्ध केलं आकाशगंगेचा रंगीत फोटो

दरम्यान, सत्तेत आलेल्या शिंदे गट आणि भाजप सरकारने मुंबईतील कांजूर मार्ग येथील कारशेड प्रकल्पाला स्थगिती देऊन आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरे बचाव आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. पर्यावरणवाद्यांच्या आंदोलनाला आपला भक्कम पाठिंबा असल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं होतं.

Read Also : आजही राज्यात मुसळधार पाऊस कायम

आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल आणि मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं होतं. या आंदोलनासाठी आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर करून घेतल्याचे राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी