सर्वात मोठी ब्रेकिंग: अखेर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर!

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 05, 2020 | 10:29 IST

Ministry Portfolios: गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्र ज्या खातेवाटपाची वाट पाहत होतं ते खातेवाटप अखेर आज (रविवार) जाहीर झालं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

finally maha vikas aghadi govt ministry portfolios declared by chief minister uddhav thackeray
सर्वात मोठी ब्रेकिंग: महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • राज्यपालांच्या मंजुरीनंतर महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर
 • मुख्यंमत्र्यांनी पाठविलेल्या यादीवर राज्यपालांची सही
 • राष्ट्रवादीला अर्थ, गृहसह अनेक महत्त्वाची खाती

मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप अखेर आज (रविवार) जाहीर झालं आहे. गेले अनेक दिवस खातेवाटप जाहीर न झाल्याने सरकारवर टीका करण्यात येत होती. मात्र, आता संपूर्ण मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आलं आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांनी कालच खाते वाटपासंबंधीची यादी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राज्यपालांकडे पाठविली होती. मात्र, त्या यादीवर राज्यपालांनी आज सही केल्याने आता हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खाते वाटपात सर्वाधिक महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असल्याचं दिसतं आहे. कारण की, यामध्ये गृह, अर्थ, गृहनिर्माण यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती त्यांच्या वाट्याला आली आहे. 

 

 

पाहा महाविकास आघाडी सरकारचं संपूर्ण खातेवाटप: 

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) - सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय - खाती 

अजित पवार (उपमुख्यमंत्री) - अर्थ, नियोजन

 1. एकनाथ शिंदे - नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 

 2. सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा

 3. छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

 4. जयंत पाटील - जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास

 5. बाळासाहेब थोरात - महसूल 

 6. नितीन राऊत - ऊर्जा 

 7. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

 8. दिलीप वळसे पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क

 9. धनंजय मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

 10. विजय वड्डेटीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य

 11. अनिल देशमुख - गृहमंत्री

 12. हसन मुश्रीफ - ग्रामविकास 

 13. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण 

 14. डॉ. राजेंद्र शिंगाणे - अन्न आणि औषध प्रशासन 

 15. नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता

 16. राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

 17. सुनिल केदार - दुग्धविकास, पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण  

 18. संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 

 19. गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता

 20. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक 

 21. दादा भुसे - कृषी, माजी सैनिक कल्याण 

 22. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण 

 23. संदिपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन

 24. बाळासाहेब पाटील - सहकार, पणन  

 25. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास 

 26. अनिल परब - परिवहन, संसदीय कामकाज 

 27. उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण 

 28. के.सी. पाडवी - आदिवासी विकास 

 29. शंकरराव गडाख - मृदा व जलसंधारण 

 30. असलम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास 

 31. आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

 32. संजय बनसोडे - (राज्यमंत्री) पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य 

 33. दत्तात्रय भरणे - (राज्यमंत्री) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृदा व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन

 34. बच्चू कडू - (राज्यमंत्री) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक वि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार

 35. सतेज पाटील - (राज्यमंत्री) गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

 36. विश्वजित कदम - (राज्यमंत्री) सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

 37. शंभूराजे देसाई - (राज्यमंत्री) गृह (ग्रामीण), अर्थ, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

 38. अब्दुल सत्तार - (राज्यमंत्री) महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

 39. आदिती तटकरे - (राज्यमंत्री) उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

 40. प्राजक्त तनपुरे - (राज्यमंत्री) नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

 41. राजेंद्र पाटील यड्रावकर - (राज्यमंत्री) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी