INS Vikrant Scam : मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केले आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले असा आरोपे संजय राऊत यांनी केला होता. आता सोमय्या पिता पुत्रांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir against kirit somaiya and son neel somaiya over ins vikrant scam mumbai police probe)
Mark my words
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 7, 2022
INS विक्रांत चया नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल. pic.twitter.com/juqXvAUa68
माजी सैनिक बबन भोसले यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय दंड विधान ४२०,४०६ आणि ४३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले आणि पीएमसी बँकेतून हा पैसा पांढरा केला असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाने ७११ मोठ्या बॉक्समधून पैसे गोळा केले. हे सर्व बॉक्स सोमय्या यांच्या नीलमनगर कार्यालयात आणले गेले. या पैश्यांचे बंडल बांधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तिथे बोलवण्यात आले होते. हे पैसे पीएमसी बँकेत वळवण्यात आले. आणि हे पैसे व्हाईट करून नील सोमय्याच्या व्यवसायात आणि किरीट सोमय्या यांच्या निवडणुकीत वापरण्यात आले. महाराष्ट्रातून ५८ कोटी रुपये जमा झाले होते. परंतु हा घोटाळा आणखी मोठा आहे असेही राऊत म्हणाले.
हे पैसे राजभवनमध्ये गोळा होणे अपेक्षित होते, परंतु असे कुठलेही पैसे जमा न झाल्याचे स्पष्टीकरण राजभवनने दिले आहे. आता मुंबईत पोलिसांत सोमय्या पितापुत्रांवर याबद्दल गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.