Fire at Kamala building in Mumbai 9 dead 21 injured : मुंबई : मुंबईच्या ताडदेव परिसरात कमला या २० मजली इमारतीला शनिवार २२ जानेवारी २०२२ रोजी आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला तसेच २१ जण जखमी झाले. जखमी झालेल्या २१ जणांपैकी पाच जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. तीन जणांची प्रकृती स्थिर आहे तर १३ जखमींना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे.
सर्व मृतांच्या जवळच्या नातलगांना महाराष्ट्र शासनाने पाच-पाच लाख रूपये कंपनसेशन अर्थात भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. आग प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून कमला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या जवळच्या नातलगांना दोन-दोन लाख रुपये मदत दिली जाईल. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.