Mumbai Fire : कांजूरमार्गच्या अपेक्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 16, 2021 | 07:51 IST

Mumbai Fire :मुंबईच्या कांजूरमार्ग (Kanjurmarg) परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Heavy Industrial Estate) भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

Fire breaks out at Samsung Service Centre in Kanjurmarg East
Mumbai Fire : कांजूरमार्गच्या अपेक्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ भीषण आग लागल्याची घटना.
  • आतापर्यंत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती

Mumbai Fire : मुंबई : मुंबईच्या कांजूरमार्ग (Kanjurmarg) परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Heavy Industrial Estate) भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली. आगीच्या ठिकाणी सिलेंडर ब्लास्ट होत आहे. 20 ते 22 सिलेंडर ब्लास्ट झाला होता. एका कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून या आगीला सुरुवात झाली अशी माहिती मिळाली आहे. या  ठिकाणी इलेक्ट्रॉनिकस वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदामे आहेत. (Fire breaks out at Samsung Service Centre in Kanjurmarg East )

अग्निशमन दलाच्यावतीने आग विझवण्याचे काम केले असून सुरू असून 10 बंब 4 टँकरसह घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग लागताच या ठिकाणचे कर्मचारी बाहेर पडले आतापर्यंत जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू- डीसीपी

सर्व्हिस सेंटरला आग लागल्याने संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनेक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. अधिक माहिती देताना घटनास्थळी उपस्थित असलेले डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. तसेच सर्व्हिस सेंटरला लागलेली भीषण आग पाहता स्थानिकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी