fire broke out at the One Avighna Park building in Mumbai : मुंबईतील लालबाग परिसरातल्या वन अविघ्न पार्क इमारतीच्या 35व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहेत. अग्निशमन दलाचे पथक (फायर ब्रिगेड) आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहे. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांची टीम पण पोहोचली आहे. परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून अग्निशमन दलासाठी मार्ग मोकळा ठेवण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
प्राथमिक वृत्तानुसार आग आज (गुरुवार 15 डिसेंबर 2022) सकाळी 10.45 वाजता लागली. ही लेव्हल वनची आग आहे. पण वर्षभरात इमारतीत दुसऱ्यांदा आग भडकल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.
SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर
आग लागण्याचे कारण समजलेले नाही. या प्रकरणी आग विझवल्यानंतर चौकशी होणार आहे. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.