मुंबई : देशभरासह राज्यभरात मोठ्या उत्साहात दिवाळी (Diwali) सण (festival) साजरा करण्यात आला. तब्बल दोन वर्षांनी देशात (country) निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत आहे. यावेळी नागरिकांकडून जोरदार फटाक्यांची आतिषबाजी (fireworks) देखील झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु या उत्साहाला मात्र आगीचे गालबोट लागले. पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. एकट्या पुण्यात (Pune) 17 ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वसईतील (Vasai) सहा ठिकाणी, तर यवतमाळ(Yavatmal)येथे 3 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. (Firecrackers set fire in many cities of the state; Fire broke out at 17 places in Pune and six places in Vasai)
अधिक वाचा : 'या' लोकांसाठी घातक आहे पोषक असलेला फणस
नागरिकांनी मोठ्या थाटामाट्यात दिवाळी साजरी केली, निर्बंध असतानाही अनेक ठिकाणी फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला. पण फटाके फोडण्याच्या नादात आग लागल्याच्या घटना घडल्या असून एकट्या पुण्यात 17 ठिकाणी आग लागली. तर वसई, विरार आणि नायगावमध्ये आगीच्या 6 घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अधिक वाचा : स्वानंदी बेर्डेचं ग्लॅमरस रुप पाहिलं का?
पुण्यातील औंधमधील डिपी रोड येथे एका इमारतीलामध्ये पहिल्या मजल्यावर फटाक्यामुळे मोठी आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए एकूण ७ फायरगाड्या, २ वॉटर टँकर व शासकीय २ आणि अग्निशमनची १ रुग्णवाहिका दाखल झाली होती, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक वाचा : एकनाथ शिंदेचं पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल
वसई पश्चिमच्या अंबाडी रोड येथील सत्यम बंगल्यात राहणाऱ्या शाह कुटुंबियांच्या घरातील एसीला आग लागली. अग्निशमन केंद्राच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचवलं. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.आगीची घटना घरातील सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील क्रांती चौकात रात्री ही घटना घडली. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.
ठाण्यात फटाके फोडल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.