Sanjay Raut on Tipu Sultan Issue । मुंबई : मुंबई महापालिकेच्या मालाड येथील टीपू सुल्तान उद्यानावरून सध्या भाजप राजकारण पेटवत आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देता भाजपच्या नेत्यांना राष्ट्रपतीच्या भाषणाची आठवण करून दिली आणि त्यामुळे राष्ट्रपतींनी अगोदर राजीनामा द्यावा लागेल असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. त्यावेळी या विषय़ावर बोलताना म्हणाले, या विषयात सर्वात अगोदर राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल, त्यांनी कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन टीपू सुल्तान यांचे किती गुणगाण केले होते. हे भाजपच्या नेत्यांनी आठवावे. त्यांचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का. हे मला सांगावे असे राऊत म्हणाले.
अधिक वाचा : या ५ जणांनी UPSC मध्ये लिहिली अशी यशोगाथा...मिळेल प्रेरणा
महाराष्ट्र पेटविण्याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जर ही भाषा असेल, सर्वात मोठा जाळपोळ करणारा पक्ष कोणता आहे हे सर्वांना माहीत आहे, पण आम्ही ते करत नाही.
आम्ही बघू टिपू सुलतान काय करायचं सरकार पाहिल, आम्हाला इतिहास कळतो तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही, आम्हाला माहित आहे टिपू सुलतान यांनी काय केलं, कसे अत्याचार केले, काय अन्याय केला, कसे ब्रिटिशांच्या विरोधात लढले, हा सगळा इतिहास आम्हाला सांगायची गरज नाही, टीपू सुल्तान कोण होता, हैदर अली कोण होता, तुम्ही जो दिल्लीचा इतिहास बदलण्याचे काम करत आहेत ते आम्ही पाहत आहे, असेही राऊत यांनी खडसावले.
अधिक वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; नितेश राणे 10 दिवसांत शरण या
हाराष्ट्र पेटवू, ही भाषा तुमच्या तोंडात असेल तर पेटवापेटवी महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे
राजीनामाची गोष्ट आहे तर सगळ्यात आधी राष्ट्रपतींचा राजीनामा तुम्ही मागणार आहात का? त्यांनीही टिपू सुलतान चे कर्नाटक मध्ये गुणगान केले होते, टिपूचे काय करायचं यासाठी मुंबईची महानगरपालिका समर्थ आहे, महाराष्ट्र सरकार समर्थ आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.