Rain Alert महाराष्ट्रात थंडीत पडणार पाऊस

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 14, 2021 | 20:01 IST

Five Days Rain Alert For Maharashtra महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडणार आहे. वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला आहे.

Five Days Rain Alert For Maharashtra
Rain Alert महाराष्ट्रात थंडीत पडणार पाऊस 
थोडं पण कामाचं
  • Rain Alert महाराष्ट्रात थंडीत पडणार पाऊस
  • अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र
  • महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडणार

Five Days Rain Alert For Maharashtra । मुंबईः महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडणार आहे. वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे ऐन थंडीत महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. 

राज्यात रविवार १४ नोव्हेंबर २०२१ ते गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.

सातारा शहर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज (रविवार १४ नोव्हेंबर २०२१) पावसाने हजेरी लावल्याची माहिती वेधशाळेने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी