NCP Ministers महाराष्ट्राच्या इतिहासात अटक झालेले ५ पैकी ४ मंत्री राष्ट्रवादीचे

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 03, 2021 | 01:13 IST

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पाच मंत्र्यांना अटक झाली. या पाच मंत्र्यांपैकी चार जण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून मंत्री झाले आहेत. अटक झालेल्या मंत्र्यांपैकी काहींनी अटक होण्याआधी राजीनामा दिला होता.

five ministers arrested in maharashtra including anil deshmukh
महाराष्ट्राच्या इतिहासात अटक झालेले ५ पैकी ४ मंत्री राष्ट्रवादीचे 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राच्या इतिहासात अटक झालेले ५ पैकी ४ मंत्री राष्ट्रवादीचे
  • पद्मसिंह पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून मंत्री झाले
  • अटक झालेल्या मंत्र्यांपैकी काहींनी अटक होण्याआधी राजीनामा दिला

five ministers arrested in maharashtra including anil deshmukh । मुंबईः महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पाच मंत्र्यांना अटक झाली. या पाच मंत्र्यांपैकी चार जण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून मंत्री झाले आहेत. अटक झालेल्या मंत्र्यांपैकी काहींनी अटक होण्याआधी राजीनामा दिला होता.

  1. पद्मसिंह पाटील - नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणात सीबीआयने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तेव्हाचे नेते पद्मसिंह पाटील यांना २००९ मध्ये अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत. मुंबईत सेशन कोर्टात केस अद्याप सुरू आहे.
  2. छगन भुजबळ - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना भुजबळांवर महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा केल्याच्या आरोप झाला. याप्रकरणी अटक झाली. दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागले. कोर्टाने दोषमुक्त केले पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोर्टाच्या आदेशाला वरच्या कोर्टात आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.
  3. जितेंद्र आव्हाड - घोडबंदर भागात राहणारे सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांचे अपहरण करून त्यांना स्वतःच्या बंगल्यावर आणून पोलिसांकरवी बेदम मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आहे. या प्रकरणी आव्हाडांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. ठाणे कोर्टाने जामीन दिला.
  4. नारायण राणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर केंद्रीयमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अटक झाली. एक दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.
  5. अनिल देशमुख - विशेष पीएमएलए कोर्टाने खंडणी वसुली आणि पैशांची अफरातफर या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी दिली. याआधी ईडीने त्यांना सोमवार-मंगळवार (१ आणि २ नोव्हेंबर २०२१ दरम्यान) दरम्यान मध्यरात्री अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी