'कार्यसम्राट' काळाच्या पडद्याआड, माजी आमदार तारासिंह यांचं निधन 

मुंबई
रोहित गोळे
Updated Sep 19, 2020 | 14:40 IST

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज (शनिवार) सकाळच्या सुमारास निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. ४ वेळा आमदारकी भूषविलेल्या तारासिंह यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामं केली होती.

Sardar Tarasingh
सरदार तारासिंह यांचे निधन  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं निधन
  • तारासिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
  • कार्यसम्राट आमदार अशी तारासिंह यांची होती ओळख

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP)माजी आमदार सरदार तारासिंह (Sardar tara Singh) यांचं आज (शनिवार) सकाळी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील मुलुंड विधानसभा क्षेत्रातून ते अनेकदा आमदार म्हणून निवडून आले होते. आपल्या विधानसभा क्षेत्रात कामाच्या जोरावर त्यांनी कार्यसम्राट अशी ओळख बनवली होती.  सामन्यांच्या मदतीला धावून जाणारे तारासिंह यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात (Leelavati Hospital) उपचार सुरु होते. 

मुलुंड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तारासिंह यांच्या निधनाविषयी ट्विटरवरुन माहिती दिली. यावेळी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना असं म्हटलं की, 'माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचं आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'

याशिवाय त्यांच्यावर उद्या सकाळी सायन येथील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देखील सोमय्या यांनी दिली आहे. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखीला तारासिंह यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

सरदार तारासिंह यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात नगरसेवक म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी मुलुंड विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. तेव्हापासून तब्बल ४ वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मुलुंड मतदारसंघ हा भाजपसाठी बालेकिल्ला बनला होता. 

सरदार तारासिंह हे भाजपचे आमदार असले तरीही इतर पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचे फार सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी