Former DGP vs. Lokmanya Tilak’s kin : माजी पोलीस महासंचालक आणि टिळकांचे वंशज निवडणुकीत आमनेसामने

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 25, 2021 | 09:58 IST

Former DGP and Lokmanya Tilak’s kin fighting election : मुंबईत एका निवडणुकीच्या निमित्ताने माजी पोलीस महासंचालक आणि टिळकांचे वंशज आमनेसामने उभे आहेत. मतदारांची संख्या विचारात घेतली तर ही स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा लहान स्वरुपाची निवडणूक म्हणता येईल. पण या निवडणुकीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Former DGP and Lokmanya Tilak’s kin fighting election
माजी पोलीस महासंचालक आणि टिळकांचे वंशज निवडणुकीत आमनेसामने 
थोडं पण कामाचं
  • माजी पोलीस महासंचालक आणि टिळकांचे वंशज निवडणुकीत आमनेसामने
  • सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक
  • माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले काँग्रेसचे समर्थक दीपक टिळक आमनेसामने

Former DGP and Lokmanya Tilak’s kin fighting election : मुंबई : मुंबईत एका निवडणुकीच्या निमित्ताने माजी पोलीस महासंचालक आणि टिळकांचे वंशज आमनेसामने उभे आहेत. मतदारांची संख्या विचारात घेतली तर ही स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा लहान स्वरुपाची निवडणूक म्हणता येईल. पण या निवडणुकीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

सावरकर स्मारकाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी लोकमान्य टिळकांचे पणतू असलेले काँग्रेसचे समर्थक दीपक टिळक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दीपक टिळक यांच्या विरोधात पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित निवडणूक लढवत आहेत. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहेत; असे प्रवीण दीक्षित यांनी जाहीर केले आहे. तर दीपक टिळक यांनी अद्याप सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यामागील भूमिका जाहीर केलेली नाही. पण स्वतःच्या उमेदवारीची घोषणा दीपक टिळक यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून केली आहे.

सावरकर यांची जाहीररित्या बदनामी करणारी काँग्रेसनिष्ठ व्यक्ती सावरकर स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी का उभी आहे हा प्रश्न चर्चेत आहे. काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या नियतकालिकात सातत्याने सावरकरांच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करण्यात आली आहेत. राहुल गांधी यांनीही वारंवार सावरकरांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. मग सावरकरविरोधी काँग्रेसच्या समर्थकाला अचानक स्मारकाच्या अध्यक्षपदात का रस वाटत आहे, असा प्रश्न सावरकरप्रेमी विचारू लागले आहेत. 

मुंबईत 'शिवाजी पार्क' मैदानाजवळ असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक हे १.६५ एकर (६६५० चौरसमीटर) भूखंडावर पसरले आहे. स्मारकात वाचनालय, प्रदर्शन आणि अनेक खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्ग चालवले जातात. सावरकर स्मारकाची निवडणूक रविवार २६ डिसेंबर २०२१ रोजी आहे. या निवडणुकीत सुमारे ४०० मतदार मतदान करतील. गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी