अनिल देशमुख यांच्या अडचणी संपेना; माजी गृहमंत्र्यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 17:02 IST

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे.

Former Home Minister Anil Deshmukh now in judicial custody
माजी गृहमंत्र्यांना आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. तसेच, सचिन वाझेला (Sachin Waze) देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष सुट्टीकालीन एकलपीठाने रविवारी रद्द केला होता. तसेच देशमुख यांना १२ नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मूदत संपल्यामुळे त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण 

अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

हवालाच्या आधारे दिल्लीहून नागपुरात यायचे पैसे

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या तपासात असे समोर आले आहे, की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

परमबीर सिंहाकडे देशमुखांविरोधात पुरावे नाहीत

दरम्यान परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या सर्वप्रथम आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी देशमुखांवर वसुलीचा आरोप केला होता. दरम्यान माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गायब असून त्यांच्याकडे देशमुखांविरोधात पुरावे नसल्याचं त्यांनी चांदिवाल आयोगाला सांगितले आहे.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी