माजी खासदार शिवाजीराव पाटलांची हकालपट्टी; शिंदेंचं अभिनंदन अन् पोस्टरमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो न टाकणं पडलं महागात

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 03, 2022 | 09:03 IST

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात सत्तातंर झालं. दरम्यान बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आता शिवसेनेकडून खासदारांवरदेखील कारवाई केली जात आहे. या कारवाईत शिवसेनेने संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळालेल्या माजी खासदाराला पक्षातून बाहेर केलं आहे. 

former MP Shivajirao Patil remove from ShivSena party
शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी   |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवाजीराव आढळकरांची हकालपट्टी
  • शिवसेनेने संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळालेल्या माजी खासदाराला पक्षातून बाहेर केलं.
  • शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं होतं.

पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात सत्तातंर झालं. दरम्यान बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आता शिवसेनेकडून खासदारांवरदेखील कारवाई केली जात आहे. या कारवाईत शिवसेनेने संसदरत्न म्हणून पुरस्कार मिळालेल्या माजी खासदाराला पक्षातून बाहेर केलं आहे. 

सेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. 

शिवाजीराव आढळराव याची हकालपट्टीची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं कॅप्शन लिहिलं होतं. परंतु यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. हेच महत्त्वाचं कारण मानलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. कारण यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. अमोल कोल्हे यांच्या विरोधीत लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत नाराज होते. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांचा मोठा वाद होता, याबाबत त्यांनी सेनेकडे तक्रारही केली होती. अशात आता आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी