Parambir Singh declared absconding मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 19:44 IST

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh declared absconding मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh declared absconding
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित 
थोडं पण कामाचं
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित
  • पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी आहेत परमबीर सिंह
  • परमबीर सिंह, रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू - फरार

Former Mumbai Police Commissioner Parambir Singh declared absconding । मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) दाखल केला होता. या अर्जावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय दिला. 

गोरेगाव वसूली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जात पाच परमबीर सिंह वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असल्याचा उल्लेख होता. अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

फरार घोषित झाल्यामुळे परमबीर सिंह यांना ३० दिवसांची मुदत मिळणार आहे. या मुदतीत न्यायालयासमोर हजर झाले नाही तर परमबीर सिंह यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. 

परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी अर्जातून न्यायालयाकडे करण्यात आली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप तपासयंत्रणेसमोर आलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचे तपासातून समोर आले आहे; असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने परमबीर सिंह, रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या आरोपींना फरार घोषित केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी