Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey Summoned By ED In Money Laundering Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीच्या दिल्लीच्या कार्यालयात चौकशीसाठी ५ जुलै २०२२ रोजी उपस्थित राहण्याकरिताचे हे समन्स आहे.
संजय पांडे मुंबई पोलीस दलाच्या आयुक्त पदावरून ३० जून २०२२ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पाच दिवसांत त्यांना ईडी समोर हजर राहण्याची वेळ आली आहे. आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे.
संजय पांडे आधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते. या पदावर असताना त्यांनी मुंबईचे त्यावेळचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या निर्णयांविरोधात जाहीरपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली. यामुळे राज्याचे गृहमंत्री अचडणीत येण्याची चिन्हं दिसू लागताच संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू झाली. राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली. आजही अनिल देशमुख तुरुंगात आहेत.
एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी एक कंपनी तयार केली होती. या कंपनीचा संबंध थेट संजय पांडे यांच्याशी होता. एनएसईच्या सर्व्हरमधील महत्त्वाची मिळवत ही कंपनी आर्थिक लाभ मिळवत होती, असा आरोप होत आहे.
ईडीने परमबीर सिंह यांच्यावर दबाव टाकण्याच्या प्रकरणात आणि एनएसईच्या प्रकरणात संजय पांडे यांना समन्स बजावले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.