Eknath Shinde Not Reachable : आमदारांसोबत एकूण 4 मंत्रीही नॉट रिचेबल, शिवसेनेतील बंडामुळे राजकीय हालचालींना वेग

आमदारांसोबत शिवसेनेचे चार मंत्रीदेखील नॉट रिचेबल असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाचं गांभिर्य वाढलं आहे.

Eknath Shinde Not Reachable
शिवसेनेचे चार मंत्रीही नॉट रिचेबल  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे चार मंत्रीही 'नॉट रिचेबल'
  • मंत्रीही गायब असल्याने बंडाचं गांभीर्य वाढलं
  • शिवसेनेत बंड

Four ministers not reachable : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि 14 आमदार सध्या नॉट रिचेबल असल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. गायब झालेल्यांमध्ये केवळ आमदारच नाही तर 4 मंत्र्यांचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाला अधिक गंभीर स्वरूप आलं आहे. ज्यांच्याकडे सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी आहे, असे चारजण सोमवार संध्याकाळपासून गायब असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं चित्र आहे. यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आणि संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. 

अधिक वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदे दुपारी २ वाजता गुजरातमधून घेणार पत्रकार परिषद

सत्तारांनी भाजप मतदान केल्याची चर्चा

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीतही भाजपला मतदान केल्याची चर्चा रंगली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार संतोष दानवे यांनी शनिवारी माध्यमांसमोर हा दावा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. ते अब्दुल सत्तार आता गायब झाल्यामुळे दानवे यांच्या दाव्यात तथ्य असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेची जी मतं सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटली, त्यामध्ये सत्तारांचाही सहभाग होता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

अधिक वाचा - सुरतेतील झटक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होणार?

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई हे एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गायब असलेल्या आमदारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदेंसोबत देसाईंचे अनेक वर्षांपासूनचे संबंध असून शिंदे यांच्या सांगण्यावरून ज्या आमदारांनी भाजपला विधान परिषद निवडणुकीत मदत केली, त्यात देसाई यांचाही सहभाग असल्याची चर्चा आहे. 

फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेदेखील कट्टर एकनाथ शिंदे समर्थक नेेते आहेत. भुमरे हे मराठवाड्यातील आमदार असून एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ उभे राहणारे बहुतांश आमदार हे ठाणे आणि मराठवाड्यातील असू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आतापर्यंत तेरा आमदार शिंदेसोंबत सूरतमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेनं दुपारी 12 वाजता सर्व आमदारांची बैठक बोलावली असून त्यानंतर खरं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे हे आमदार आहेत नॉट रिचेबल

1.शहाजी बापू पाटील

2.महेश शिंदे सातारा

3.भरत गोगावले

4.महेंद्र दळवी

5.महेश थोरवे

6.विश्वनाथ भोईर

7.संजय राठोड

8.संदीपान भुमरे

9.उदयसिंह राजपूत

10.संजय शिरसाठ

11.रमेश बोरणारे

12.प्रदीप जैस्वाल

13.अब्दुल सत्तार

14. ज्ञानराज चौगुले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी