आजपासून मुंबईत पश्चिम रेल्वेच्या आणखी 8 एसी लोकल गाड्या धावणार; मुंबईकरांचा प्रवास होणार वातानुकूलित

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 22, 2021 | 14:14 IST

Western Railway introduces 8 more AC local : मुंबईच्या जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकल रेल्वेमध्ये (Local train) अजून काही गाड्याची भर पडणार आहे. या नवीन गाड्या वातानुकुलित (Air-Conditioned) असणार आहेत.

Western Railway introduces 8 more AC local trains in Mumbai
आजपासून पश्चिम रेल्वेच्या अजून आठ एसी लोकल गाड्या धावणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पश्चिम रेल्वे विभागाने सुरू केल्या आठ नवीन एसी लोकल रेल्वे.
  • रेल्वे मंत्रालय भविष्यात सर्व रेल्वे एसीमध्ये रुपांतरीत करणार.
  • लोकलमधील प्रवाशी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रवासी भाडे कमी करण्याची शक्यता.

Western Railway introduces 8 more AC local : मुंबई : मुंबईच्या जीवनवाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोकल रेल्वेमध्ये (Local train) अजून काही गाड्याची भर पडणार आहे. या नवीन गाड्या वातानुकुलित (Air-Conditioned) असणार आहेत. यामुळे धावपळ करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास पश्चिम रेल्वे आराम आणि वातानुकूलित होणार आहे.

पश्चिम रेल्वे (Western Railway) विभाग अजून आठ एसी लोकल (AC local Trains) गाड्या रुळावर आणणार आहे. या गाड्यासह वातानुकूलित गाड्याची संख्या एकूण 20 झाली आहे.  "WR च्या उपनगरीय विभागात प्रवाशांच्या सोयीसाठी आठ नवीन एसी सेवा सुरू केल्या जातील, एसी सेवांची संख्या 20 वर नेली जाईल,” एका अधिकाऱ्याने सांगितले. माध्यमाच्या अहवालानुसार, या 8 नवीन गाड्यापैकी प्रत्येकी चार रेल्वे या  "अप" आणि  चार "डाउन" च्या दिशेने आहेत. तर दोन गाड्या गर्दीच्या वेळेत चालतील. नवीन ट्रेन्सपैकी अधिकृत एक विरार आणि चर्चगेट स्थानकादरम्यान, दोन बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान आणि एक गोरेगाव आणि चर्चगेट दरम्यान धावेल. तर  "डाऊन" दिशेने, चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान एक लोकल, चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान दोन आणि चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान एक लोकल धावेल, असेही ते म्हणाले.

मध्य रेल्वे (CR) विभागात सध्या एकूण 26 AC लोकल ट्रेन सेवा कार्यरत आहेत. या 26 सेवांपैकी 16 सेवा ठाणे-वाशी-पनवेल दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर कार्यरत आहेत आणि उर्वरित 10 सेवा मुख्य मार्गावर आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालय एसी लोकल ट्रेनमध्ये प्रवासी वाढवण्यासाठी प्रवास भाडे कमी करू शकतात आणि अधिक सुविधा देऊ शकतात. भविष्यात, मंत्रालय सर्व लोकल गाड्यांचे वातानुकूलित डब्यांमध्ये रूपांतर करू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी