फरार परमबीर सिंह यांच्या वेतनाला ब्रेक; निलंबनासंदर्भातही सरकारच्या हालचाली

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 27, 2021 | 09:02 IST

मुंबईचे माजी पोलिस महासंचालक (Former Director General of Police, Mumbai) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर आता त्यांचा पगार (Salary) थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

fugitive Parambir Singh Salary Stopped
फरार परमबीर सिंह यांच्या वेतनाला ब्रेक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • परमबीर सिंह यांच्यावर काही दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप झाला होता.
  • अनेक महिन्यांपासून परबीर सिंह सेवेत गैरहजर
  • परमबीर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते जूनपासून कोणतीही सबब न देता गैरहजर राहिले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस महासंचालक (Former Director General of Police, Mumbai) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने (State Government) पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर आता त्यांचा पगार (Salary) थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सेवेत दाखल न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  याशिवाय राज्य सरकारकडून त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भातही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 

परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलाश चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती दाखल केली होती. या समितीने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकवेळा नोटीस पाठवूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे ते इतर देशात पळून गेल्याची चर्चा आहे.

परिणामी त्यांना फरार घोषित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. यात परमबीर यांच्यासह २५ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन देण्यात आल्याचे कळते. मात्र गृह मंत्रालयाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेला आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलिस महासंचालकांना कळविले असल्याचे समोर येत आहे.

परमबीर यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते जूनपासून कोणतीही सबब न देता गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे जुलैपर्यंतचे वेतन कोषागार कार्यालयाकडून काढण्यात आले. परमबीर यांची कार्यालयातील उपस्थिती किंवा वैद्यकीय रजा याविषयी कोषागार कार्यालयाला कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे गृहरक्षक दलाकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडूनही माहिती मिळाली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी