अखेर ठरलं, झाले मंत्रीमंडळाचे खातेवाटप, वाचा संपूर्ण यादी

मुंबई
Updated Dec 12, 2019 | 18:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्रातील नवीन ठाकरे सरकारचे खाते वाटप झाले असून याची एक यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांमध्ये हे खाते वाटप करण्यात आली आहेत.

cm uddhav thackeray maharashtra vikas aghadi minister portfolio political news in marathi google newsstand
अखेर ठरलं, झाले मंत्रीमंडळाचे खातेवाटप, वाचा संपूर्ण यादी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • शिवसेनेकडे महत्त्वाची खाती
 • मुख्यमंत्र्यांनी सध्या घेतले नाही कोणतेही महत्त्वाचे पद
 • सध्या वाटप झालेले खाती ही त्यात त्या पक्षाकडेच राहणार

मुंबई :  महाराष्ट्रातील नवीन ठाकरे सरकारचे खाते वाटप झाले असून याची एक यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांमध्ये हे खाते वाटप करण्यात आली आहेत. याची यादी खालील प्रमाणे 

हिवाळी अधिवेशनात काही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हे खाते वाटप करण्यात आली आहेत. ही महत्त्वाची खाती सहा मंत्र्यांकडे देण्यात आली आहेत. यात महत्त्वाची खाती शिवसेनेने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. यात बदल होऊ शकतात असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

यात खाते वाटपात शिवसेनेकडे १८ खाती, राष्ट्रवादीकडे १२ खाती आणि काँग्रेसकडे १४ खाती देण्यात आली आहेत. ही एकूण ४४ खात्यांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित १० खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे ठेवली आहे. त्यामुळे या खात्यांचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  - कोणत्याही मंत्र्याला न मिळालेली खाती 

एकनाथ शिंदे -

 1. गृह मंत्रालय
 2. नगर विकास 
 3. वने
 4. पर्यावरण 
 5. पाणी पुरवठा आणि स्वच्छता 
 6. मृद आणि जलसंधारण
 7. पर्यटन, 
 8. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 
 9. संसदीय कार्य
 10. माजी सैनिक कल्याण 


छगन भुजबळ 

 1. ग्राम विकास
 2. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास 
 3. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य 
 4. राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता
 5. अन्न व औषध प्रशासन 

विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 

 1. महसूल 
 2. उर्जा व अपारंपारिक उर्जा
 3. वैद्यकीय शिक्षणशालेय शिक्षण,
 4. पशु संवर्धन
 5. दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय 


सुभाष राजाराम देसाई 

 1. उद्योग आणि खनिकर्म
 2. उच्च व तंत्रशिक्षण 
 3. क्रीडा आणि युवक कल्याण 
 4. कृषी
 5. रोजगार हमी योजना
 6. फलोत्पादन
 7. परिवहन
 8. मराठी भाषा 
   

जयंत पाटील 

 1. वित्त आणि नियोजन
 2. गृहनिर्माण
 3. सार्वजनिक आरोग्य 
 4. सहकार व पणन 
 5. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण 
 6. कामगार 
 7. अल्पसंख्यांक विकास 

नितीन राऊत 

 1. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) 
 2. आदिवासी विकास
 3. महिला व बाल विकास 
 4. वस्त्रोद्योग 
 5. मदत व पुनर्वसन
 6. इतर मागासवर्ग 
 7. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग
 8. विमुक्त जाती
 9. भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी