INS Vikrant : आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे भाजपला दिले, सुनावणी दरम्यान धक्कादायक माहिती आली समोर

आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे हे सरकारकडे जमा न होता एका राजकीय पक्षाला देण्यात आल्याचे समोर आले आहे. आज मुंबई हायकोर्टात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणी न्यायालय आज निर्णय देईल.

kirit somaiya
किरीट सोमय्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे हे सरकारकडे जमा न होता एका राजकीय पक्षाला देण्यात आल्याचे समोर आले आहे.
  • आज मुंबई हायकोर्टात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
  • या प्रकरणी न्यायालय आज निर्णय देईल.

INS Vikrant : मुंबई : आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे हे सरकारकडे जमा न होता एका राजकीय पक्षाला देण्यात आल्याचे समोर आले आहे. आज मुंबई हायकोर्टात भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणी न्यायालय आज निर्णय देईल. वकील अशोक मुंदरगी यांनी किरिट सोमय्या यांची बाजू मांडली. आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे हे भाजपला देण्यात आले अशी माहिती वकील अशोक मुंदरगी यांनी दिली. फक्त भाजपच नव्हे तर शिवसेनेनेही ही अशी मोहीम हाती घेतली होती असेही मुंदरगी म्हणाले. 

आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी ५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते, हे पैसे राजभवनकडे आलेच नाही अशी माहिती राजभवनने अधिकृत पत्रक काढून दिली. तेव्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे पैसे गेले कुठे असा सवाल केला. तेव्हा किरीट सोमय्या यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी हे पैसे राजकीय पक्षाला दिल्याचे सांगितले. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. तसेच या पैश्यांची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा ताबा पोलिसांना द्यावा आणि त्यांच जामीन अर्ज फेटाळून लावा अशी मागणी घरत यांनी केली आहे. 

काय म्हणाले सरकारी वकील

शासनातर्फे अटकपूर्वे जामीन अर्जाला विरोध करण्यात आला आहे. मिळलेल्या तक्रारीनुसार चर्चगेट स्थानकासह अनेक रेल्वे स्थानकावर आयएनएस विक्रांतच्या डागडुजीसाठी पैसे जमा करण्यात आले. राजभवनाकडे असा कुठला निधी जमा झाला का याची विचारणा करण्यात आली तेव्हा राजभवनाने असा कुठलाही निधी मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आयएनएस विक्रांतसाठी एकूण ५७ कोटी रुपये जमा करण्यात आले होते, याची चौकशी करण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा पोलिसांना ताबा गरजेचा आहे. आरोपी व्हिडीओ आणि छायाचित्रांमध्ये आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा करताना दिसत आहेत, परंतु त्यांनी कुणालाही पावती दिलेली नाही. हा निधी गोळा करण्यासाठी आरोपींनी कुठलीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही असे प्रश्न उपस्थित केले गेले. हे पैसे भाजपला दिल्याचे आरोपींनी म्हटले आहे असेही घरत म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी