सीईटी परीक्षेच्या प्रवेशाचा अर्ज भरण्याची वेबसाइट बंद

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 21, 2021 | 22:29 IST

महाराष्ट्राचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचे अर्ज ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही वेबसाइट पण बंद झाली.

FYJC CET Website Crashed
सीईटी परीक्षेच्या प्रवेशाचा अर्ज भरण्याची वेबसाइट बंद 

थोडं पण कामाचं

  • सीईटी परीक्षेच्या प्रवेशाचा अर्ज भरण्याची वेबसाइट बंद
  • अर्ज भरण्याची मुदत २६ जुलै २०२१ पर्यंत
  • अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी

मुंबईः महाराष्ट्राचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचे (Common Entrance Test - CET) अर्ज ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ही वेबसाइट पण बंद झाली. सीईटीचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठीची वेबसाइट मंगळवारपासून बंद आहे. FYJC CET Website Crashed

अर्ज भरण्याची मुदत २६ जुलै २०२१ पर्यंत आहे. पण मंगळवार २० जुलै पासून वेबसाइटला ठप्प आहे. अनेकांनी वारंवार प्रयत्न करुनही वेबपेज उघडत नाही. यामुळे सीईटीसाठी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढवावी आणि वेबसाइटच्या तांत्रिक समस्या तातडीने सोडवाव्या अशी मागणी केली आहे. याआधी निकालाच्या दिवशी दहावीचा रिझल्ट दर्शविणारी वेबसाइट वारंवार बंद पडल्यामुळे अनेकांना बराचवेळ निकाल बघता आला नव्हता.

आधी दहावीच्या रिझल्टची वेबसाइट आणि आता अकरावीच्या सीईटीच्या (FYJC CET 2021) ऑनलाइन अर्जाची वेबसाइट वारंवार ठप्प होत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त आहेत. पण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad, Education Minister) आणि शिक्षण संचालक दिनकर पाटील (Dinkar Patil, chairman, Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) यांच्याकडे वेळ नाही. वेबसाइट वारंवार बंद पडत असेल तर त्यावर काय उपाय करणार, सीईटीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देणार की नाही या प्रश्नांना राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी उत्तर दिलेले नाही. 

वेबसाइट सुरू होत नसेल तर अकरावीच्या सीईटीसाठी अर्ज कसा भरायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच राज्य सरकारने बारावीचा निकाल जाहीर लवकरच जाहीर करू आणि नंतर तेरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेऊ असे सूतोवाच केले आहे. दहावी-अकरावीचे प्रश्न सुटले नसल्यामुळे बारावी-तेरावीचे प्रश्नही अनुत्तरित राहणार का, अशी चिंता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी