मुंबई : आज श्री गणेश चतुर्थी (Shri Ganesh Chaturthi) आहे अनेकजण आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं (Ganapati Bappa) आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला प्रारंभ होईल. गणपती बाप्पांचं स्वागत पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनीही केले असून त्यांनी नागरिकांना गणेश चुतर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Ganesh Chaturthi; PM Modi and CM Shinde congratulated citizens on Ganeshotsav)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाची स्थापना केली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली.
यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं. “राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.
Read Also : आजपासून पुढचे दिवस 'या' जिल्ह्यात पावसाचा Yellow Alert
एकनाथ शिंदे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “आज श्री गणेश चतुर्थी. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ”
देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना व सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देताना ते म्हणाले की, श्रीगणेशाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संकटांचा नाश करणार्या आणि ज्यांच्याकडून कार्य सिद्धीस जाते अशा गणेशजींना आपण नेहमी नमस्कार करतो आणि पूजा करतो. जनतेला शुभेच्छा देताना ते म्हणाले की, गणरायाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं, ''यतो बुद्धिरज्ञाननाशो मुमुक्षोः, यतः सम्पदो भक्तसन्तोषिकाः स्युः. यतो विघ्ननाशो यतः कार्यसिद्धिः, सदा तं गणेशं नमामो भजामः. गणेश चतुर्थी की ढेरों शुभकामनाएं. गणपति बाप्पा मोरया!''
Read Also : PM Kisan Yojanaच्या लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस आहे महत्त्वाचा
बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची स्थापना आणि पूजेसाठी दिवसभरात एकूण 6 शुभ मुहूर्त असतील. सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 11.20 ते दुपारी 01.20 पर्यंत असेल, कारण हा मध्याह्न काळ असेल, ज्यामध्ये श्रीगणेशाचा जन्म झाला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.