Ganesh Chaturthi : गणेशोत्सवासाठी जाणार्‍या गाड्यांसाठी मुंबई पुणे महामार्गावर स्वतंत्र मार्गिका द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

गणेशोत्सवासाठी जाणार्‍या गाड्यांना मुंबई पुणे द्रुतगती महामार्वावर स्वतंत्र मार्गिका देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनी रविवरी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि या सूचना दिल्या.

cm eknath shinde meeting
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गणेशोत्सवासाठी जाणार्‍या गाड्यांना मुंबई पुणे द्रुतगती महामार्वावर स्वतंत्र मार्गिका देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
  • एकनाथ शिंदे यांनी रविवरी खालापूर टोलनाक्याला भेट दिली.
  • त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि या सूचना दिल्या.

Ganesh Charuthi : मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणार्‍या गाड्यांना मुंबई पुणे द्रुतगती महामार्वावर स्वतंत्र मार्गिका देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे यांनी रविवरी खालापूर टोलनाक्याला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि या सूचना दिल्या. (ganesh chaturthi separate line for mumbai pune express highway cm eknath shinde orders on klahapur toll naka)

सण,उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच टोलनाक्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे तसेच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करून सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौर्‍यावर होते, सातार्‍याहून परतताना शिंदे यांनी पुण्यातील चांदणी चौक परिसराला तसेच मुंबईत पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला भेट दिली. शिंदे यांनी महामार्गावरी वाहतुक कोंडीचा आढावा घेतली. 

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मंत्रिपद नाही ते नाही, परिषदही नाही? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत नवी माहिती उघड

अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकार्‍यांसोबत महामार्गावरील वाहतुक कोंडी आणि टोलनाक्यावर चर्चा केली. आगामी गणेशोत्सव पाहता भाविकांसाठी स्वतंत्र मार्गिका देण्याचे शिंदे यांनी आदेश दिले.  गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन  त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर


सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याकरिता तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात असे सांगत वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी यंत्रणेने जलदगतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी