मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचे आयोजन, मुंबई-पुण्यातील आवडत्या बाप्पांचे करता येणार दर्शन

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 18, 2022 | 20:08 IST

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित उत्सवानंतर यंदा गणेश चतुर्थी महाराष्ट्रात पूर्ण उत्साहात साजरी केली जाणार आहे.  भाविकांचा हा आनंद द्विगुणित करण्यासााठी महाराष्ट्र पर्यंटन विभाग मुंबई-पुण्यात सहलीचा उपक्रम राबवणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) पर्यटन विभागाने (Department of Tourism) यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील लोकप्रिय गणपती पंडालच्या मार्गदर्शित सहलींचे नियोजन केले आहे.

Maharashtra Tourism Department Mumbai-Pune Bappa Darshan
महाराष्ट्र पर्यटन विभाग मुंबई-पुण्याच्या बाप्पांचे दर्शन   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महामारीच्या काळात गणेशोत्सवादरम्यान, गणेश मूर्तींची उंची मर्यादित करण्यात आली होती.
  • गणेश चतुर्थीपासून सुरू होणारी सहल 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी संपतील.

Mumbai: कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित उत्सवानंतर यंदा गणेश चतुर्थी महाराष्ट्रात पूर्ण उत्साहात साजरी केली जाणार आहे.  भाविकांचा हा आनंद द्विगुणित करण्यासााठी महाराष्ट्र पर्यंटन विभाग मुंबई-पुण्यात सहलीचा उपक्रम राबवणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Government of Maharashtra) पर्यटन विभागाने (Department of Tourism) यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील लोकप्रिय गणपती पंडालच्या मार्गदर्शित सहलींचे नियोजन केले आहे. पुण्यातही (Pune) अशा टूर उपलब्ध असतील. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी उत्सव (Ganesh Chaturthi festival) साजरा होणार आहे.

महामारीच्या काळात गणेशोत्सवादरम्यान, गणेश मूर्तींची उंची मर्यादित करण्यात आली होती आणि सार्वजनिक उत्सवांवर इतर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. परंतु यंदा मात्र गणेशोत्सवाचा आनंद वाढविण्यासाठी  सरकार देखील प्रोत्साहन देत आहे.  पर्यटन संचालनालय (Dol) नोंदणीकृत पर्यटक मार्गदर्शकांच्या सहकार्याने हे दौरे आयोजित करेल. गणेश चतुर्थीपासून सुरू होणारी सहल 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी संपतील. या सहली दरम्यान भाविक पर्यटक परळ येथील ‘गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत’ देखील उपस्थित राहू शकतील. जिथे हे पर्यंटक गट मूर्ती बनवण्याचा/शिल्प करण्याचा प्रयत्न करू शकतील आणि व्यावसायिक मूर्तीकाराशी भेटून संवाद साधू शकतील. 

Read Also : मोबाइलवर असा सेट करा भगवान श्रीकृष्णाचा वॉलपेपर

या उपक्रमांतर्गत, भाविक पर्यटक मुंबईतील किल्ले परिसरातील प्रसिद्ध किल्लेचा राजा, गिरगावातील केशवजी नाईक चाळ गणपती, लालबागचा राजा, लालबागमधील गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आणि वडाळामधील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीला भेट देऊ शकतील.  इतकेच काय तर भाविक पर्यटक पुण्यातील प्रसिद्ध गणपती बाप्पांचे देखील दर्शन करू शकतील. पुण्यातील कसबा पेठेचा कसबा गणपती, नारायण पेठेतील केसरी वाड्याचा केसरी वाडा गणपती, आणि तांबडी जोगेश्वरी गणपती, तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रावसाहेब दानवे येथे सुद्धा पर्यटक भेट देऊ शकतील. 

Read Also : सूरज पांचोली जिया खानचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता

सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेदरम्यान ही सहल असणार आहे. भारतातील भाविक पर्यटकांसाठी या सहलीसाठी 850 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तर 1,600 रुपयांचे शुल्क हे परदेशातील पर्यटकांना आकारले जाणार आहे. पुण्यातील सहलीसाठी एका व्यक्तीला 350 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. तर परदेशातील पर्यटकांना 550 रुपये आकारले जातील. पुण्यातील सहलीची वेळ ही सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी