Dahi Handi and Ganeshotsav: राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधमुक्त, दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे होणार

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 21, 2022 | 16:48 IST

Dahi Handi and Ganeshotsav 2022: राज्यात यंदाच्या वर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे करता येणार आहेत.

Ganeshotsav Dahi handi 2022 no restriction in this year in maharasthra for celebrating festivals said cm eknath shinde
राज्यात गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधविना, दोन्ही सण धुमधडाक्यात साजरे होणार 
थोडं पण कामाचं
  • गणेश मूर्तींच्या उंचीवर कुठलीही मर्यादा नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • गणेशोत्सवा दरम्यान ज्यादा बसेस सोडण्याचे एसटी प्रशासनाला निर्देश
  • बाल गोविंदांबाबत कोर्टाच्या नियमांचे पालन करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ganeshotsav and Dahi handi celebration in Maharashtra: कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून लसीकरणही मोठ्या वेगाने सुरू आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (Ganeshotsav Dahi handi 2022 no restriction in this year in maharasthra for celebrating festivals said CM Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे इच्छा असतानाही हे उत्सव धुमधडाक्यात साजरे करता आले नाहीत. पण यंदाच्या वर्षी सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षी असलेल्या मर्यादा हे लक्षात घेऊन गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात साजरे व्हायला हवेत. याच संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली आणि कायदा-सुव्यवस्था राखून शांततेत हे उत्सव साजरे झाले पाहिजेत यासाठी सर्व पोलीस, जिल्हा प्रशासनांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा : सोनिया गांधींची ईडी चौकशी, कार्यकर्त्यांनी कार पेटवली!

गणेशोत्सव मंजळांना नोंदणी शुल्कात सूट

गणेशोत्सव आणि दहीहंडीसह इतर उत्सव सुरळीत पार पडायला हवेत यासाठी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. यासोबतच मंंडपाची परवानगी प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी एक खिडकी योजनेद्वारे परवानग्या देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मंडपाच्या संदर्भात कुठलेही शुल्क न घेण्याचेही आम्ही सांगितले आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

गणेश मूर्तीवर कुठलीही मर्यादा नाही

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, गणेश मूर्तीवर मर्यादा होती ती मर्यादा यंदाच्या वर्षी काढून टाकण्यात आली आहे.

दहीहंडी उत्सव साजरा करताना नियम पाळा

दहीहंडी उत्सव साजरा करताना सर्व नियम पाळले पाहिजेत. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या नियमांचं पालन व्हायला हवं.

अधिक वाचा : मुंबईत साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ

युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहनांना टोलमाफी

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वेगाने रस्त्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णयही घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी