२२ वर्षीय तरुणावर चालत्या कारमध्ये ३ तास सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 12, 2019 | 08:28 IST

Mumbai Gang Rape: मुंबईत एका अल्पवयीन आरोपीसह चार जणांनी एका २२ वर्षीय तरुणावर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

gang rape in a car with a 22 year old boy four accused arrested
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • मुंबईत २२ वर्षीय तरुणावर चालत्या कारमध्ये बलात्कार
  • आरोपींनी इंस्टाग्रामवरुन तरुणाला शोधलं, सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघे अटकेत
  • सामूहिक बलात्कारप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीलाही अटक

मुंबई: मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी या तरुणाला शोधण्यासाठी इंस्टाग्राम पोस्टचा आधार घेतला आणि त्यानंतर त्याचं अपहरण केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणासोबत चार आरोपींनी तब्बल ३ तास चालत्या कारमध्ये बलात्कार केला आणि नंतर रस्त्यातच फेकून दिलं. 

मुंबई पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं असून सर्व आरोपींना अटकही करण्यात आली आहे. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून त्याला बालसुधार गृहात पाठविण्यात आलं आहे. 

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हीबी नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, चारही आरोपी पीडित तरुणाला सुरुवातीपासूनच इंस्टाग्रामवर फॉलो करायचे. रविवारी तरुणाने एका रेस्टॉरंटच्या बाहेरील सेल्फी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावेळी चारही आरोपींनी ही पोस्ट पाहिली आणि ते थेट त्या रेस्टॉरंटमध्ये पोहचले. या रेस्टॉरंटमध्ये पोहचताच त्यांनी थेट तरुणाजवळ जाऊन त्याच्याशी बातचीत सुरु केली. यावेळी त्यांनी तरुणाला सांगितलं की, ते त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करतात आणि ते त्याचे फॅन आहेत. 

त्यानंतर चौघांनी त्याला बाइक राइडचा आग्रह केला. तरुण देखील या चौघांसोबत बाइक राइडला तयार झाला. त्यानंतर पाचही जण जवळजवळ २० मिनिटानंतर मुंबई एअरपोर्टजवळील एका हॉटेलजवळ पोहचले. त्यानंतर चौघांनी त्याला एका कारमध्ये बसण्यास जबरदस्ती केली. यानंतर पुढील तीन तास चारही आरोपींनी त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्याला रस्तावरच फेकून देण्यात आलं. 

जेव्हा तरुणाला शुद्ध आली तेव्हा त्याने तात्काळ आपल्या आई-वडिलांना फोन करुन घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली आणि तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी काही तासातच चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर या तीनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून एका अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी