Gateway Of India Gets Crack: अजस्त्र लाटा अन् अनेक वादळं झेलणारा गेट वे ऑफ इंडिया झाला कमकुवत; पुरातत्व विभागाचा अहवाल

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 09, 2023 | 10:00 IST

मुंबईतील  (mumbai) ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियासंबंधित (Gateway Of India) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या वास्तूला 100 वर्ष जुन्या वास्तूला धोका निर्माण झाल्याची बाब महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून (Structural Audit Report) समोर आली आहे.

Gateway Of India Gets Crack ; Maharashtra Archeology Department report
गेट वे इंडियाला तडे; पुरातत्व विभागाचा अहवाल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गेट वे ऑफ इंडियाला तडे गेल्यामुळे ही इमारत कमकुवत होण्याची शक्यता आहे.
  • राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला गेट वे इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे.
  • पुरातत्व विभागाने 6.9 कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

मुंबईः वर्षानुवर्ष समुद्राच्या अजस्त्र लाटा आणि अनेक वादळे झेलणाऱ्या मुंबईतील  (mumbai) ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियासंबंधित (Gateway Of India) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या वास्तूला 100 वर्ष जुन्या वास्तूला धोका निर्माण झाल्याची बाब महाराष्ट्र पुरातत्व विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमधून (Structural Audit Report) समोर आली आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याचे यात सांगण्यात आले आहे. (Gateway Of India Gets Crack ; Maharashtra Archeology Department report )

अधिक वाचा  : पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मामध्ये किती अंतर ठेवाल

गेट वे ऑफ इंडियाला तडे गेल्यामुळे ही इमारत कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र सरकारकारला गेट वे इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु सरकार संवर्धनाचा प्रस्ताव मान्य करणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. ही वास्तू देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षण आहे. अशा या वास्तूला आता तडा गेला आहे. 

अधिक वाचा  : राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी तापमानात वाढ

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारतीच्या दर्शनी भागात भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी वनस्पतीही वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तर, घुमटावरील वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रीटचेदेखील नुकसान झाले आहे. त्यानंतर पुरातत्व विभागाने  6.9 कोटींचा संवर्धनाचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. दरम्यान  हा प्रस्ताव अद्याप मंजुर झालेला नाहीये. परंतु सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेट वे ऑफ इंडियासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ, असं आश्वासन दिलं आहे. 

कधी बांधला होता गेट वे ऑफ इंडिया

गेली 100 वर्ष ही वास्तू मुंबईच्या किनाऱ्यावर दिमाखात उभी आहे. ब्रिटनचे किंग पंचम जॉर्ज आणि त्यांची पत्नी क्वीन मेरी यांच्या भारतभेटीच्या निमित्ताने समुद्रात भराव घालून गेट वे ऑफ इंडियाची कमान उभारण्यात आली. 1911 साली मुंबईच्या समुद्र किनारी ही वास्तू बांधण्यात आली. तर, 1924 साली सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.  

अधिक वाचा  : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

पिवळ्या बेसाल्ट आणि काँक्रीटने ही वास्तू बांधण्यात आली. गेटवे ऑफ इंडियाचे स्ट्रक्चरल डिझाईन 26 मीटर उंचीच्या मोठ्या कमानीच्या स्वरूपात बनवले आहे. गेटवे ऑफ इंडियाची वास्तुशैली इंडो-सारासेनिक शैलीत तयार करण्यात आली आहे. भव्य इमारतीच्या संरचनेत मुस्लिम स्थापत्य शैलीच्या खुणा देखील आढळतात. स्मारकाच्या मध्यवर्ती घुमटाचा व्यास अंदाजे 48 फूट आहे, तर या वास्तूची  एकूण उंची 83 फूट आहे.

गेट वे ऑफ इंडियाच्या काही बाबी 

  • गेटवे ऑफ इंडियाचा घुमट बांधण्यासाठी 21 दशलक्ष रुपये खर्च आला आणि संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी 2.1 दशलक्ष रुपये खर्च आला.
  • काही काळानंतर गेटवेवर छत्रपती शिवाजी आणि स्वामी विवेकानंदांचे पुतळे बसवण्यात आले.
  • गेटवे ऑफ इंडियाला मुंबईचा ताजमहाल असेही म्हणतात.
  • गेटवे ऑफ इंडिया इंडो, कुलाबा, मुंबई येथे आहे. हे सारसेनिक आर्किटेक्चरचे एक अद्भुत उदाहरण आहे ज्याची उंची जवळजवळ आठ मजली इतकी आहे. 
  • गेटवे ऑफ इंडिया हा एलिफंटा गुहांचा प्रारंभ बिंदू आहे.
  • गेटवे ऑफ इंडिया हे ब्रिटीश औपनिवेशिक राजवटीचे चित्रण करणारे एक स्‍मारक चिन्ह आहे. 
  • भारताच्या स्वातंत्र्यानंतर शेवटचे ब्रिटीश सैन्य याद्वारे युरोपात परत गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी