गौतम अदानीच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी गाठला सागर बंगला, पडद्यामागे नेमकं काय...

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले.

Gautam Adani meets Raj Thackeray!
गौतम अदानी राज ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे नेमकं काय... 
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंच्या भेटीला गौतम अदानी
  • ठाकरे कुटुंबियांकडून अदानींचे स्वागत
  • त्यानंतर राज ठाकरे पोहोचले फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आज सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्ताकारणावर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना कुणाची यावर सुनावणी असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष्य दिल्लीकडे लागले होते. दरम्यान, मुंबईत सायंकाळी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ निवासस्थानी भेट घेतली. (Gautam Adani meets Raj Thackeray!)

अधिक वाचा : Shivsena Symbol Case: धनुष्यबाण कुणाचा ?, दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर काय केला युक्तिवाद

ज्यात संत्तासंघर्ष तीव्र होत असताना उद्योगपती अदानी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या. या भेटीचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. यामध्ये राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी अदानी यांचे स्वागत केले. त्यानंतर ठाकरे आणि अदानी यांच्यामध्ये अर्धा तास बंद कमऱ्यामध्ये चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये  धारावी पुनर्विकासाविषयी चर्चा, अशी माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा : ​Beed आष्टी तालुक्यातल्या तब्बल 200 शेतकऱ्यांची जीवघेणी कसरत!

काही वेळानंतर अदानी शिवतिर्थावरून बाहेर पडताच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. तिथे दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे सागर बंगल्यातून बाहेर पडले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी दोन नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीला विशेष महत्व आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी