"पप्पा, तुमची खूप आठवण येतेय” Vilasrao Deshmukh यांच्या पुण्यतिथीला सूनबाईंचे पाणावले डोळे

Genelia D'souza emotional note : अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने तिच्या इन्स्टा वर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यांचे सासरे विलासराव देशमुख यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी हे फोटो शेअर करून एक भावनिक पत्र लिहिले आहे.

Genelia D'souza wrote Man Ki Baat on her father-in-law Vilasrao Deshmukh's death anniversary.
Vilasrao Deshmukh : "पप्पा, तुमची आम्हाला खूप आठवण येते” यांच्या पुण्यतिथीला सूनबाईंच्या डोळ्यात पाणी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जेनेलिया देशमुखने एक पत्र लिहिली
  • आजोबांसमोर मुलं डोकं टेकवताना दिसली
  • जेनेलियाच्या पोस्टमुळे माझे डोळे ओले होतील

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 14 ऑगस्ट 2012 रोजी किडनी आणि फुफ्फुस निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले.  आज त्यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची सून रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने टाकलेला फोटोही खूपच भावस्पर्शी आहे.(Genelia D'souza wrote Man Ki Baat on her father-in-law Vilasrao Deshmukh's death anniversary.)

अधिक वाचा : Independence Day: 'या' OTT वेबसीरिज आणि सिनेमांसह स्वातंत्र्यदिन सेलिब्रेट करा,

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुखने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'आई, आम्ही आजोबांना एखादा प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का??” त्यांच्या या प्रश्नावर कोणतीही शंका मनात न ठेवता मी त्यांना म्हणाली, जर तुम्ही त्यांचे ऐकले तर ते तुम्हाला नक्कीच उत्तर देतील.

अधिक वाचा : म्हातारी झाली म्हणून काय झालं?, शौक तर...., Neena Gupta चा छोटे कपडे घालून बनवला असा व्हिडिओ

तिने पुढे लिहिले की, मी इतकी वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याशी बोलण्याचा आणि प्रत्येक गोष्टींची उत्तरं मिळवण्यात घालवली आहेत. मला माहित आहे की तुम्ही आमच्या कठीण काळात आमच्यासोबत होतात आणि आनंदाच्या काळात आमच्यासोबत आनंदही व्यक्त केलात. मला माहित आहे की आमच्या प्रत्येक शंकांचे तुम्ही उत्तर दिले आणि मला चांगलंच माहितीय की, मी जे लिहित असते, ते तुम्ही वाचत असता. मला अजूनही आठवते की तुम्ही आम्हाला वचन दिले होते की, जर आम्ही तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवले तर तुम्ही कायम आमच्यासाठी उपलब्ध असाल. पप्पा तुमची आम्हाला खूप आठवण येते”, असे जिनिलियाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

पहिल्या फोटोत जेनेलिया आणि तिचा पती रितेश देशमुख यांची मुले रियान आणि राहिल त्यांच्या आजोबांच्या फोटोजवळ बसलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत तिची मुले रितेशचे वडील विलासराव देशमुख यांचे आशीर्वाद घेताना दिसतात. जेनेलियाचे फोटो शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी हार्ट इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये पूर आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी