मुलींसाठी मुंबई सुरक्षित? माटुंगा स्थानकात दिवसाढवळ्या तरुणीची छेडछाड

मुंबई
पूजा विचारे
Updated Feb 06, 2020 | 14:01 IST

मांटुगा रेल्वे स्थानकात दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्टेशनवरील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलांसाठी मुंबई खूप सुरक्षित असल्याचं मानलं जातं.

girl molested At matunga station
मुलींसाठी मुंबई सुरक्षित? माटुंगा स्थानकात दिवसाढवळ्या तरुणीची छेडछाड  |  फोटो सौजन्य: YouTube

मुंबई: मांटुगा रेल्वे स्थानकात दिवसाढवळ्या महिलांची छेडछाड काढल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्टेशनवरील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलांसाठी मुंबई खूप सुरक्षित असल्याचं मानलं जातं. पण या घटनेमुळे मुंबईतल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का ? आता असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंगणघाट आणि औरंगाबादेमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच माटुंगा रेल्वे स्थानकात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृतानं दोन मुलींसोबत छेडछाड केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना 26 जानेवारी माटुंगा स्थानकावर दुपारी घडल्याचं समोर आलं आहे. एक तरूणी पुलावरून जात असताना विकृत मनुष्य तिच्या मागून गेला आणि तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं लगेचच तिथून पळ काढला. एवढ्यात नेमकं आपल्यासोबत काय झालं याची भणक सुद्धा त्या तरूणीला लागली नाही. ती हतबल होऊन तिथून निघून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. या विकृताला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. 

दरम्यान  हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.

25 जानेवारीला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना सीसीटीव्हीत दिसतोय. यानंतर तो आजुबाजूला कोणी नाही याची खात्री करुन घेतो आणि महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो. त्यानंतर 26 जानेवारीला तो पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसतोय. यावेळी तो जबरदस्ती तिच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पळ काढतो. आणखी एका घटनेत माटुंगा पुलावर दोन महिला एकमेंकीसोबत बोलताना दिसत आहेत.  त्यावेळी सुद्धा त्यानं त्यातल्या एका महिलेला स्पर्श केला आहे. 

माटुंगा रेल्वे स्थानकावरील सहा आणि सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पुलावर हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे सगळं कैद झालं आहे. या पुलावर रात्री सात वाजल्यानंतर हवी तशी वर्दळ नसते आणि आरोपीने याचाच फायदा घेत महिलांचा विनयभंग केला. सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे त्याने आतापर्यंत दोन महिलांचा विनयभंग केला आहे. आरोपीला पोलिसांनी सापळा रचत चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याची ओळख पटली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी