Court Rejected Deshmukh's Homemade meals Demand: मला घरचं जेवण द्या देशमुखांची मागणी; न्यायालय म्हणतं, आधी तुरुंगातील जेवण घ्या, मग विचार करू...

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 16, 2021 | 08:37 IST

Court Rejected Deshmukh's Homemade meals Demand: आर्थिक गैरव्यावहारप्रकरणी (Money Laundering case) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबईच्या विशेष न्यायालयानं (PMLA)14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली.

Give me a home-cooked meal Deshmukh's demand
देशमुखांना तुरुंगात हवं घरचं जेवण, पण न्यायालय म्हणतय....  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना तुरुंगात स्वतंत्र बेड मिळेल पण जेवण मात्र कारागृहातलंच.
  • अनिल देशमुखांनी आपल्याला घरचं जेवण मिळावं अशी विनंती न्यायालयात केली होती.
  • 29 नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना न्यायालयीन कोठडी

Court Rejected Deshmukh's Homemade meals Demand: मुंबई:  आर्थिक गैरव्यावहारप्रकरणी (Money Laundering case) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबईच्या विशेष न्यायालयानं (PMLA)14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली. दोन नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख यांना ईडीनं(Ed) अटक केली होती. न्यायालयात असताना देशमुखांना न्यायालयाने घरच्या जेवणाऐवजी तुरुंगातील जेवण खा असं म्हटलं आहे. 

सोमवारी अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान न्यायालयात असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोठडीत घरचे जेवण (Homemade meal) देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे. 'आधी तुरुंगातील जेवण घ्या, अशा शब्दात फटकारत न्यायालयाने विनंती अर्ज फेटाळून लावला आहे. अनिल देशमुख यांनी घरचे जेवण मिळावे यासाठी अर्ज केला होता. मात्र, या अर्जावरील सुनावणी काही दिवसांनंतर होणार आहे. देशमुख यांना तुरुंगातील जेवणामुळे काही समस्या उद्भवल्यास घरच्या जेवणासाठी अर्ज करावा, असं न्यायालयाने सांगितलं. म्हणजे तोपर्यंत राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना इतर कैद्याप्रमाणे तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे.

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात  हजर करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत त्यांना घरचे जेवण मिळण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली. तर देशमुखांना तुरुंगात वेगळा बेड देण्याची विनंती मात्र मान्य करण्यात आली आहे. प्रकृतीचं कारण दिल्याने त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.अनिल देशमुख यांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून युक्तीवाद केला.

अनिकेत निकम यांनी न्यायालयात सांगितलं की, देशमुख यांचे वय आणि आजारांचा विचार करुन त्यांना बेड, औषधं आणि घरचं जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयाने तुरुंगात स्वतंत्र बेड लावयची परवानगी दिली. शिवाय कारागृहातील डॉक्टरांना दाखवून औषधे नेण्याची परवानगी दिली आहे. जेवणासंदर्भात न्यायालयाने अनिल देशमुख यांची याचिका तुर्तास फेटाळली आहे. 

दरम्यान, आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावला होता. अटक टाळण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयानं अर्ज फेटाळला. ईडीनं अनिल देशमुख यांना सर्वात आधी 26 जून रोजी समन्य पाठवला होता. त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यलयात हजर झाले. चौकशीनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी