Christmas celebrations 2022: काही दिवसांवर ख्रिसमस ( Christmas) आणि वर्ष संपतीचा दिवस येऊ घातला आहे. हे दोन दिवस असे आहेत, ज्यावेळी लोक जंगी सेलिब्रेशन(celebrations) करत असतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि ख्रिसमस साजरा करण्यासाठी बहुतेकजण गोव्याकडे रवाना होत असतात. गोव्याला पर्यटकांचा (Tourists) वाढता लोढा बघता लक्झरी बसेसने आपले भाडे वाढवली आहेत. मुंबई ते गोवासाठी बसेसचे भाडे 2,500 रुपये करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी गोवा ट्रिप महाग वाटू शकते. परंतु भाडे वाढ झाल्यानंतरही पर्यटकांचा लोढा वाढू लागला आहे. (Goa become favorite place for Christmas celebrations,buses, trains are full )
अधिक वाचा : वीर सावरकरांचा दयेचा अर्ज ही कृष्णनीती होती - राज ठाकरे
तिकीट दरातवाढ करूनही 24 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत प्रवासासाठी जवळपास 70 टक्के सीट्स बूक झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे वाहतूक एका बाजूची आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या सेलिब्रशनसाठी पर्यंटक गोव्याला प्राधान्य देतात. त्यानंतर महाबळेश्वर, सिल्वासा, लोणावळा, खंडाळा, दमण या ठिकाणी जात असतात. या ठिकाणी पर्यटक आपल्या कुटुंबासोबत छोट्या ट्रिपसाठी येत असल्याचं एका ट्रव्हल एजंटने सांगितले.
अधिक वाचा : अरे देवा! मुंबईत उद्या-परवा 24 तासांसाठी पाणीकपात
नुसत्या बसेसच नाही तर बहुतेक गाड्याही पूर्णपणे बुक केलेल्या आहेत. जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकण कन्या एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेससह मुंबई आणि गोवा दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या 28 डिसेंबरसाठी पूर्ण क्षमतेनुसार बुक केल्या आहेत. बस ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस हर्ष कोटक यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुमारे 1,800 खाजगी बसेस MMRवरून महाराष्ट्रातील प्रमुख शहरे तसेच शेजारील राज्यांशी जोडली गेली आहेत. यापैकी 70 टक्के बसेस ह्या 24 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 दरम्यानच्या प्रवासासाठी आधीच आरक्षित आहेत.
“गेल्या वर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने केवळ 1,200 बसेस खासगी टूर ऑपरेटर्सनी चालवल्या होत्या, या वर्षीची प्रचंड मागणी लक्षात घेऊन आम्ही आणखी बस चालवत आहोत,” असं कोटक म्हणाले. पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने बसेसचे भाडे देखील वाढतील यात शंका नाही. "सध्या मुंबई ते गोवा लक्झरी बस सेवेचे तिकीट सुमारे 1,600 रुपये आहे, परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते 3,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे," असे एका खाजगी बस मालकाने सांगितले. इतकेच नाही तर 24 ते 31 डिसेंबर दरम्यान मुंबई ते गोवा या प्रवासासाठी त्यांच्या बसच्या बहुतेक तिकिटीस विकले गेले आहेत. परंतु परतीची तिकिटे मात्र विकली गेली नसल्याचे ते म्हणाले आहेत.
अधिक वाचा : उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहू नका- BJP
यावर एका दुसऱ्या बस मालकाने सांगितले की, तिकीट दरवाढीवर दु:ख व्यक्त केले आहे. सणासुदीच्या काळात फक्त एकतर्फी बुकिंग मिळते, म्हणून आम्हाला भाडे वाढवण्याची सक्ती केली जाते. परंतु आम्ही जास्त भाडे वाढवत नसल्याचं ते म्हणाले. भाडे वाढवण्याची मर्यादा ही MSRTC (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) लक्झरी बस सेवांच्या 1.5 पट आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोव्यात जाण्यासाठी तुम्ही प्लानिग केलं असेल तर खालील दिलेल्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही नवीन वर्ष आणि ख्रिसमस साजरा करू शकतात. गोव्यात 200 पेक्षा जास्त चर्च आहेत. यातील निवडक चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त मोठ्या संख्येने नागरिक तेथे जात असतात. यातील काही चर्चविषयीची माहिती आम्ही देत आहोत.
गोव्यात 200 पेक्षा जास्त चर्च आहेत. यातील बेसिलिका ऑफ बोम जीसस चर्च येथे ख्रिसमस निमित्त मोठ्या संख्येने नागरिक येतात.
ख्रिसमसच्या वेळी अरम्बोल बीचवर म्युझिक पार्टीचे आयोजन केले जाते
ख्रिसमस इव्हनिंगला अगौडा फोर्ट येथे आकर्षक रोषणाई केली जाते. ही रोषणाई, ख्रिसमस ट्री आणि इतर सजावट बघण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी होते. तुम्हाला बीचवर जाणे आवडत असेल तर बागा बीच, सॅटर्डे नाइट मार्केट, कलंगुट बीच, वगाटर बीच येथे ख्रिसमस पार्टी होत असतात.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.